बहुगुणी डेस्क, वणी: इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या वतीने दिला जाणारा सावित्रीच्या लेकी हा पुरस्कार नुकताच घोषीत कऱण्यात आला आहे. यात राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या 9 महिलांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील प्राध्यापिका व इतिहास विभाग प्रमुख डॉ. रेखा बडोदेकर यांना संशोधन क्षेत्रासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्यासह अभिनेत्री पर्ण पेठे – सांस्कृतिक मुंबई, प्रा. डॉ. प्रज्ञा कामडी – शैक्षणिक (नागपूर), प्रा. डॉ. शिला स्वामी – सामाजिक (उस्मानाबाद), प्रा. डॉ. राजश्री देशपांडे – साहित्य (पुणे), अर्चना मोहिते – प्रशासन (मुंबई), ॲड.पल्लवी रेणके – राजकीय (सोलापूर), राणी जाधव – महिला बचत गट (पिंपरी चिंचवड) इंडियन स्टुडंट कौन्सिलचा उत्कृष्ट पुरस्कार प्रा. माधुरी राऊत इ. जाहीर करण्यात आला.
सांस्कृतिक, संशोधन, शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, प्रशासन, राजकीय व महिला बचत गट या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्यात महिलांना राज्यस्तरीय पुरस्कार इंडियन स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष प्रा. ज्ञानोबा कदम यांनी जाहीर केले आहे. हा पुरस्कार सोहळा म. फुले वाडा गंज पेठ पुणे येथे दि. २७ जानेवारी २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात येणार आहे.
माहिती व तंत्र युगातील विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक यांची समतावादी संघटना असलेल्या इंडियन स्टुडंट कौन्सिल व महाराष्ट्र संचालनालये पुरातत्व विभाग पुणे वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त दर वर्षी हा पुरस्कार जाहीर केला जातो.
Comments are closed.