पुरुषोत्तम नवघरे, वणी: सोमवारी अयोध्या येथे श्रीरामलल्ला विराजमान व मंदिराचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. या निमित्ताने श्री काळाराम मंदिर, रामपुरा वणी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
सोमवारी पहाटे ५.३० वा. काकडा आरती होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत श्री राम दरबार विग्रह अभिषेक होमहवन होणार आहे. 12 वाजता विजय चोरडिया यांच्या शुभहस्ते (पंडित श्री. निशिकांत वैष्णव, नांदुरा, खामगाव-शेगांव) महाआरती व महाप्रसाद वितरण व भजनाचा कार्यक्रम, राम रक्षा स्तोत्र, राम नाम जाप व श्री हनुमान चालिसा पठण होणार आहे. सार्वजनिक समाज महिला मंडळ व आर्य वैश्य समाजा तर्फे विणा वागेश्वरी महिला भजन मंडळ, वणी आयोजक: शालिनीताई चंद्रशेखर गंगशेट्टीवार, छायाताई उपलेंचीवार
सायं. ६.०० सायं. ७.०० महाआरती व पूर्ण मंदिरात दीपोत्सव व आतिषबाजी यासह संगीतमय सुंदरकांड पाठ सादरकर्ते: ह.भ.प. मनुमहाराज तुगनायत व संच करणार आहे.
शहरातील प्राचीन श्री.काळा राम मंदिर रचना:-
शहरातील प्रचिन हेमाडपंथी मंदिरांपैकी एक मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम कोणत्या दशकात झाले. हे सांगणे कठीण असले तरी हे मंदिर 12 व्या शतकात बांधले गेले असावे असा अंदाज आहे. मोठमोठ्या काळ्या पाषाणापासून हे मंदिर तयार केले आहे. एकूण 43 दगडी स्तंभावर सभामंडप उभे आहे. त्यावर नक्षीकाम करून तीन दगड एकावर एक ठेऊन तयार केले आहे.
सभामंडपात प्रवेश करता, डाव्या बाजूला श्री गणेशाची 6 फूट उंची मूर्ती असलेले मंदिर आहे.तर उजव्या बाजूला श्री.हनुमान त्यांची 5 फूट उंचीची मूर्ती असलेले मंदिर आहे.पुढे 2 शिवलिंग असलेले मंदिरे आहे.हे शिवलिंग 2 ते 3 फूट रुंदीचे असून रामेश्वर व सोमेश्वर जोतिर्लिंगाची प्रतिकृती असल्याचे सांगण्यात येते. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री.गणेश, श्री.गरुडदेव. श्री.नागवासुकी यांच्या काळ्या पाषाणाच्या मुर्त्या आहे.
या दोन्ही मंदिराच्या मध्ये श्री.काळा राम मंदिर आहे. यात सम्पूर्ण राम दरबार आहे. श्री. राम, सीता माता, लक्ष्मण, शत्रुगन, हनुमान यांच्या मुर्त्या आहे. श्री. रामाची काळ्या पाषाणापासून तयार केलेली मूर्ती त्यांच्या मांडीवर माता सीता विराजमान आहे. ही मूर्ती मनमोहन व सुबक कारागिरी चा उत्तम उदाहरण आहे. गाभाऱ्याच्या दरवाज्यावरील दगडात कोरलेल्या शिलालेखात मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन पूर्व 1100 मध्ये राजा सिकंदर यांनी केल्याचे संस्कृत भाषेत लिहिले आहे.
मंदिराची रचना वास्तुशास्त्र नुसार झाली असावी, सभामंडपच्या डाव्या बाजूला श्री. गणेश मंदिर उजव्या बाजूला हनुमान मंदिर आणि अगदी पुढे श्री काळा राम मंदिर आहे.मंदिराच्या पुढे मोकळे मैदान आहे.मंदिराच्या चौबाजूनी दगडी चिऱ्यांची कुंपण भिंत आहे.मंदिर परिसरात एक विहीर आहे.खूप खोल व मोठी आहे. विशेष म्हणजे या भागात पाणी लागत नाही. असे म्हटले असताना विहिरीला बारमाही पाणी असते.
याच वर्षाला कैलास नवघरे यांनी परिसरातील सहकारी यांच्या सोबत मिळून विहीरिचा उपसा केले. आता विहित जवळपास 20 ते 25 फूट गोड पाणी राहते. मागील दोन वर्षांपूर्वी आमदार निधीतून एक सभागृहा बांधण्यात आले.यामुळे परिसरातीन नागरिकांना छोटे मोठे कार्यक्रम करण्यासाठी अल्पशा दरात सभागृह उपलब्ध केले जाते.त्यातूनच मंदीर खर्च काढला जातो.मंदिर प्राचीन असल्याने आता काही भाग पडझडीला आला आहे.त्यामुळे मंदिराचे जीर्णोद्धार करणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांनी सढळ हाताने मददत करावी असे आव्हान मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
Comments are closed.