शुल्लक कारणावरून आई व मुलीत वाद, अल्पवयीन मुलीची आत्महत्या

वणी तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या....

विवेक तोटेवार, वणी: शालेय शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीत व आईत शुल्लक कारणावरून वाद झाला. या शुल्लक कारणाने आलेल्या रागातून अल्पवयीन मुलीने थेट आत्महत्येचेच पाऊल उचलले. तालुक्यातील रासा शेत शिवारात ही घटना घडली. ज्योत्स्ना आत्राम (14) असे मृत मुलीचे नाव आहे. शनिवारी दुपारी 4 नंतर ही घटना उघडकीस आली. तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अय्या आत्राम हे मारेगाव तालुक्यातील सुसरी पेंढरी येथील रहिवासी आहे. ते रासा येथील महेंद्र राखुंडे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. ते शेतातच त्यांची पत्नी सह राहतात. तर त्यांची मुलगी ज्योत्स्ना ही पेंढरी येथे आजी-आजोबासह राहायची. ती गावातीलच शाळेत 8 व्या वर्गात शिकत होती. सध्या शेतीचा हंगाम असल्याने गेल्या आठवड्यात ती आई वडिलांना मदत करण्यासाठी रासा येथे शेतातील घरी आली होती.

शनिवारी दिनांक 20 जानेवारी रोजी आई आणि मुलीमध्ये काही कारणास्तव वाद झाला. राग अनावर झाल्याने मुलगी तडकाफडकी शौचाचे कारण देऊन जवळच्या शेतात गेली. मात्र बराच कालावधी झाल्यानंतरही ती परत आली नाही. त्यामुळे तिची आई मुलीचा शोध घेत गेली. दरम्यान लगतच्या एका शेतात ज्योत्स्ना ही एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळताच आई हादरली. तिने आरडाओरड करत नव-याला बोलवले. दरम्यान याची माहिती शेतमालकाला व गावातील पोलीस पाटलांना देण्यात आली. ज्योत्स्नाला दवाखान्यात आणले असता. डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. शुल्लक कारणावरील रागातून मुलीने हे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा: 

21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

थाप मारून थापाड्या गेला… 3 लाखांचा गंडा घालून गेला…

Comments are closed.