वणी-मारेगाव महामार्ग बंद करू नका… परिसरातील गावातील लोकांची मागणी
जिल्हाधिकारी यांना निवेदन, राजूर, निंबाळा, भांदेवाडा इ. गावक-यांची मागणी
बहुगुणी डेस्क, वणी: शनिवारी दिनांक 27 जानेवारी ते 2 फेब्रु. दरम्यान परसोडा येथे भव्य शिवपुराण कथा होत आहे. त्या अनुषंगाने 7 दिवसाच्या प्रवचनाला लाखो भाविकांची त्या ठिकाणी कथा ऐकण्या साठी गर्दी होणार आहे. याकरिता कायदा आणि सुवयवस्थेचा भाग म्हणून मारेगाव ते वणी हा महामार्ग बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी, गृहविभागाने काढला आहे. ह्यामुळे राजूर, निंबाला, भांदेवाडा, बोदाड, झरपट, सोमनाला व कळमना ह्या गावांना त्रास होणार आहे. ह्या करीता संबंधित गावांचा रहिवासियांकडून वणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तर कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी वणीला आलेले ए.डी. एसपी जगताप ह्यांची गावक-यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी पोलीस विभाग सहकार्य करेल व मार्ग संबंधित बाधित गावांना मोकळा करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
वणी ते मारेगाव हा महामार्ग बंद करण्यात आल्याने कोणतीही वाहने नेता येणार नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेत नेता येणार नाही. वणी व लाल पुलिया परिसरात तसेच अन्य ठिकाणी रोज मजुरीवर जाणाऱ्या मजुरांना कामावर जाता येणार नाही. ऑटो ने वणीला शाळा व कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जाता येणार नाही त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. वाहतूक बंद झाल्याने चुना उत्पादन ठप्प होणार परिणामी चुना उद्योगातील शेकडो कामगार रोजमजुरी पासून वंचित होणार.
गावात किराणा व अन्य आवश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प होईल व येथील किराणा व अन्य व्यवसाय बंद राहतील व त्यामुळे येथील नागरिक आवश्यक वस्तूंपासून वंचित होतील. कोळसा खाण व अन्य कामावर येणारे कामगार वाहतूक अभावी येऊ शकतं नसल्याने कोळसा व अन्य उत्पादनावर परिणाम होणार आहे, त्यामुळे राजूर, भांदेवाडा, निंबाळा ग्रामपंचायत व राजूर बचाव संघर्ष समितीने हा रस्ता सुरू ठेवण्याची मागणी केली.
यावेळेस राजूर सरपंच विद्या पेरकावार, मोहम्मद असलम , कुमार मोहरमपुरी, जयंत कोयरे, साजिद खान,अनिल डवरे, प्रदीप बांदुरकर, सुशील आडकिने, प्रवीण पाटील, श्रीनिवास अलवलवार, महेंद्र श्रीवास्तव, भांदेवाडा उपसरपंच प्रेमा धानोरकर, निंबाला सरपंच सुनीता मनोज ढेंगले, कळमना सरपंच राहुल क्षीरसागर, झरपट येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप माटे प्रामुख्याने उपस्थित होते.
Comments are closed.