गुरुनगर येथे कॉलेज तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येला व्हॅलेन्टाईन डेची किनार?

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गुरुनगर येथे राहत असलेल्या एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विवेक उमेश बोंडे (19) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो मेंढोली येथील रहिवासी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसले तरी प्रकरणाला व्हॅलेन्टाईन डेची किनार असल्याची चर्चा रंगत आहे.

Podar School 2025

विवेक हा त्याच्या बहिणीसह वणीतील गुरुनगर येथे खंदारे यांच्या घरी भाड्याने राहत होता. तो मारेगाव येथील एका महाविद्यालयात बीएस्सीच्या सेकंड इयरला शिकत होता. गुरुवारी त्यांची बहिण गावी गेली होती. त्यामुळे तो घरी एकटाच होता. मात्र आज शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास त्याने खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्याने रात्रीच आपले जीवन संपवले असल्याचा अंदाज आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आत्महत्येला व्हॅलेन्टाईन डेची किनार?
विवेकने गळफास घेतल्याचे कळताच त्याच्या गावात आणि मित्रपरिवाराला धक्का बसला. आत्महत्येच्या एक दिवस आधीच व्हॅलेन्टाईन डे होता. त्यातून तर त्याने हे पाऊल उचलले नाही, अशी चर्चा सध्या रंगत आहे.

घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. विवेकच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.