वणीत शेतक-यांच्या समर्थनात तीव्र निदर्शने आंदोलन

शेकडो शेतकरी उतरले रस्त्यावर, विविध संघटनांचा सहभाग

पुरुषोत्तम नवघरे, वणी: देशभरातील शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली होती. याच्या समर्थनात वणीत छत्रपती शिवाजी चौकात शेतक-यांनी जोरदार निदर्शने आंदोलन केले. यावेळी शेतक-यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. किसान सभे तर्फे हे आंदोलन करण्यात आले. या संघटनेत विविध सामाजिक संघटनांनी सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिला.

किमान आधारभूत किमतीची हमी देण्यासाठी कायदा करावा या मागणीसाठी कामगार संघटनांसह शेतकरी संघटनांनी गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन करीत आहे. यासह बेरोजगारी, महागाई, गॅसचे दर कमी करणे, अत्यावश्यक वस्तूंवरील जीएसटी हटवणे, शैक्षणिक धोरण, कामगार कायदे इत्यादी मागणीसाठी वणीत जोरदार निदर्शने करण्यात आले. आंदोलनात मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनानंतर उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर एसडीओंना विविध मागणींचे निवेदन देण्यात आले.

यावेळेस माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी, ॲड. दिलीप परचाके, मनोज काळे, कवडू चांदेकर, गजानन ताकसांडे, नंदू बोबडे, भाकपचे अनिल घाटे, सुनील गेडाम, बंडू गोलर, वासुदेव गोहने, प्रवीण रोगे, अथर्वा निवडींग, शेतकरी संघटनेचे देवराव धांडे, संभाजी ब्रिगेड चे अजय धोबे, क्रांती युवा संघटनेचे अक्षय कवरासे, स्पर्धा परीक्षा चे प्रा. आशिष इंगोले यांचे सह अनेक गावातील स्त्री पुरुष कष्टकरी वर्ग उपस्थित होता.

हे देखील वाचा: 

गुरुनगर येथे कॉलेज तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

26 वर्षांनंतर वणीत रंगणार शंकरपटाचा थरार

Comments are closed.