अज्ञाताने लावले डॉ. आंबेडकर भवन वाचनालयाला कुलूप

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथील आमदार निधितून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यकरण व सार्वजानिक वाचनालय खोलीचे बांधकाम करण्यात आले. मात्र या वास्तु वर मालकी हक्क बजावून ताबा मिळवलेल्या सार्वजानिक वास्तुला अज्ञाताने कुलुप ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही वास्तू खुली करण्याची मागणी घेवून येथील समस्त बौद्ध बांधवांद्वारे मुख्याधिकारी, ठाणेदार व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

मारेगाव येथे आमदार निधीतून काही वर्षापूर्वी डॉ. आंबेडकर चौकामध्ये असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यकरण व वाचनाल्याच्या खोलीचे बांधकाम करण्यात आले होते. आता मात्र याच सार्वजानिक वास्तु वर मालकी हक्क बजावणाच्या हेतुने मालकी हक्क बजावुन कुलुप लावून ताब्यात घेतल्याने व त्या वास्तु मधे प्रवेश करण्यास मनाई करत असल्याने मारेगाव येथील समस्त बौद्ध बांधवांचे भावना दुखावल्या गेल्या आहे. त्यामुळे त्यांनी रोष व्यक्त करीत ही सार्वजनिक वास्तू खुली करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी, ठाणेदार व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी विनोद गाणार,विष्णु वानखड़े, अजाबराव गजभिये, गौतम दारूंडे, राजेंद्र करमनकर, गजानन चंदनखेडे, हंसराज कांबळे, विलास रायपुरे, राजू पाटील, ईश्वर वानखड़े,अनंता खाडे, हंसराज पाटील, विजय खाडे, वसुमित्र वनकर, छोटू गजभिये आदी बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.