पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुंजच्या मारोती जवळील संविधान चौकात भीषण अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीला एका ट्रकने चिरडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाला. आज दुपारी 1 वाजताच्या सुमरास ही घटना घडली. दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी दुचाकी घेऊन उभा असलेल्या एका व्यक्तीला ट्रकने मागून धडक दिली. मात्र सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले. काही वेळाच्या अंतरात दोन अपघात झाल्याने परिसर हादरून गेला.
सविस्तर वृत्त असे की राहुल बोरा (40) वरोरा येथील रहिवासी आहे. तो माढळी येथील एका जिनिंगमध्ये काम करतो. तर मृतक मृतक दिलीप कुमावत (वय अंदाजे 18) रा. मध्यप्रदेश हा कामगार म्हणून काम करतो. आज बुधवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास राहुल हा मृतक दिलीप याच्यासह आपली हिरो होन्डा स्प्लेंडर या दुचाकीने (MH 34 AQ9047) वणीला कामानिमित्त येत होता. तो बायपासवरून लाल पुलियाच्या दिशेने चालला होता. दरम्यान राहुलने संविधान चौकात टर्न घेतला. त्याच वेळी मागून एक ट्रक (MH 34 AB 6232) वणीकडून लालपुलियाच्या दिशेने चालला होता. दरम्यान संविधान चौकात ट्रकने दुचाकीला मागून जबर धडक दिली.
बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...
या धडकेत दुचाकीचालक बाजूला जाऊन कोसळला तर त्याच्या मागे बसून असलेला त्याचा सहकारी दिलीप हा डाव्या बाजूच्या समोरच्या चाकात आला. त्यानंतर त्याच्या अंगावरून मागचे चाकही गेले.या अपघातात दिलीपचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचालक राहुलच्या पायाला व कमरेला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. ट्रकच्या चाका खाली आल्याने मृतकाचा चेंदामेंदा झाला होता.
अपघात होताच लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. त्यातील काहींनी याची माहिती ऍम्बुलन्सला दिली. घटनेची माहिती मिळताच युवासेनेचे अजिंक्य शेंडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने जखमीला ऍम्बुलन्सने वणीतील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आला.
थोड्याच वेळात दुसरा अपघात अपघातस्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती. त्याच वेळी एक दुसरा दुचाकीस्वार गणेश उपरे हा घटनास्थळी प्लाटिना या दुचाकीने (MH29AG 2326) थांबला होता. दरम्यान मागून एक ट्रक (MH34 BG 2082 )आला व त्याने दुचाकीला जबर धडक दिली. मात्र ट्रक मागून येत असल्याचे वेळीच लक्षात आल्याने गणेशने दुचाकी जागेवर ठेवून बाजूला उडी मारली. मात्र दुचाकीला ट्रकने धडक दिली. यात सुदैवाने जीवित हानी टळली असली तरी यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या दोन्ही अपघाताने संविधान चौक हादरून गेला.
दुस-या अपघातातील दुचाकी
सदर जागी रस्त्यावरच्या पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर वनवे वाहतूक सुरू आहे. त्यामुळे संविधान चौक हा सध्या अपघाताचा हॉट स्पॉट झाला आहे. या प्रकरणी दोन्ही ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणीचा वणी पोलीस तपास करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.