विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात एकाच दिवशी दोघांनी विष पिऊन आत्हमत्येचा प्रयत्न केला. यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर आहे. पहिली घटना आबई येथील आहे. तर दुसरी घटना ही निळापूर -ब्राह्मणी फाटा जवळील आहे. मारोती प्रभाकर बलकी (32, रा. आबई) असे मृताचे नाव आहे.
पहिली घटना ही आबई येथील आहे. आबई येथील मारोती प्रभाकर बलकी यांचे गावालगत शेत आहे. शुक्रवारी दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ते शेतात गेले व त्यांनी शेतात विषारी औषध प्राशन केले. मात्र लोकांना याची माहिती मिळे पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. लोकांनी याची माहिती शिरपूर पोलिसांना दिली व मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.
दुसरी घटना वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वणी घुग्गूस मार्गावरील निळापूर ब्राह्मणी फाट्याजवळील एका हॉटेलच्या मागे घडली. अनिकेत संजय तुराणकर (21, रा. सावर्ला) असे विषारी औषध प्राशन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अनिकेत हा रोजमजुरीचे काम करतो. शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्याने विषारी औषध प्राशन केले. मात्र ही बाब लगेच उघडकीस आल्याने त्याला तत्काळ वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
या दोन्ही घटनांनी वणी तालुका हादरला आहे. आबई येथील मारोती यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. प्रकरणाचा पुढील तपास शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Comments are closed.