चिखलगावच्या प्राचीन शिव मंदिरात रंगणार पदावली भजन स्पर्धा

श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळाचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी महाशिवरात्री आहे. त्यानिमित्त चिखलगाव येथील हेमाडपंथी शिव मंदिरात पदावली भजन स्पर्धा होणार आहे. श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळ आणि सार्वजनिक शिवमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन होणार आहे. चिखलगाव येथील शिव मंदिराच्या पटांगणात शुक्रवार दिनांक 8 मार्च 9 मार्च आणि 10 मार्चला ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जवळपास एक लाख रुपयांच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. शुक्रवार दिनांक 8 मार्चला पहाटे 5 वाजता ध्यान पाठ होईल. सकाळी 9.30 वाजता घटस्थापना आणि रुद्राभिषेक होईल. मंदिर परिसरात दुपारी 12 ते 3 या वेळेत रांगोळी स्पर्धा होईल. माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत चिखलगावच्या सरपंच रूपाली कातकडे ह्या उद्घाटन करतील. यावेळी उपसरपंच सुनील कातकडे, महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा, शिव मंदिराचे अध्यक्ष पंकज मोरे, सचिव राहुल बोधे, राम मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित राहतील.

राष्ट्रीय कीर्तनकार तथा सप्तखंजिरी वादक क्रांती मंगेश काळे यांचे कीर्तन सायंकाळी 7 वाजता होईल. शनिवार दिनांक 9 मार्चला पहाटे 5ला ध्यान पाठ, सकाळी 7 वाजता महाआरती, सकाळी 10 वाजता भजन आणि सायंकाळी 5 वाजता भजन स्पर्धेला सुरुवात होईल. रविवार दिनांक 10 मार्चला पहाटे 5 वाजता ध्यान पाठ, सकाळी 7 वाजता महाआरती, सकाळी 8 वाजता महाशिवरात्रीनिमित्त गावातून दिंडी निघेल. दुपारी 12 वाजता ह.भ.प. डॉ. दामोदरपंत आवारी यांचे काल्याचे कीर्तन, दहीहंडी आणि लगेच महाप्रसाद होईल. दुपारी 3 वाजता भजन स्पर्धेला सुरुवात होईल.

रात्री 8 वाजता या स्पर्धेचं बक्षीस वितरण होईल. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष पंकज मोरे, उपाध्यक्ष प्रवीण झाडे, सचिव राहुल बोधे, सहसचिव बंडू देवाळकर, कोषाध्यक्ष मारुती चवले यांच्यासह भजन मंडळ कमिटी, पदाधिकारी आणि सदस्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याची विनंती केली आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता सचिन नागपुरे (8805379670), मनोज नवले (7767044102), सुशील मोहु्र्ले (7038741838), आकाश ठेंगणे (8329314886), आशुतोष कावडे (8605833735) यांच्याशी संपर्क साधता येईल.

Comments are closed.