बहुगुणी डेस्क, मारेगाव: वयाची तिशी ओलांडली की, शक्यतो महिला चूल आणि मूल यातच अडकतात. मात्र मारेगाव येथील याच माहिलांनी आपल्या कलात्मक प्रदर्शनानं उपस्थितांना अवाक करून सोडलं. निमित्त होतं जागतिक महिला दिनाचं. मारेगाव मैत्री कट्टा गृप तर्फे ‘सन्मान स्त्री शक्तीचा जागर कर्तृत्वाचा’ हा तीन दिवसीय कार्यक्रम झाला. या तीन दिवसांत महिलांसाठी विविध कार्यक्रम झालेत. यात त्यांनी आपल्या कलागुणांचं प्रदर्शन करीत रसिकांची मने जिंकलीत. मारेगाव मैत्री कट्टा गृपने कर्तृत्वान महिलांचा भेट वस्तू देऊन सन्मान केला.
या निमित्याने तीन दिवसांचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक 8 मार्चला स्थानिक शेतकरी सुविधा केंद्र येथे विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या 600 महिलांना साडीभेट देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवेंद्र पोल्हे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष इंदू किन्हेकर, बिना दुपारे हेपट, उदय रायपुरे, दुष्यंत जयस्वाल आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. शनिवार दिनांक ९ मार्चला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्वांनी अभिवादन केलं, नंतर विविध राज्यांतील लोकनृत्य सादर करीत शोभायात्रा काढण्यात आली.
यावेळी किरण देरकर, संध्या पोटे यांनी फुगे उडवून कार्यक्रमाची सुरुवात केली. तर रविवार दिनांक १० मार्चला ३० वर्षांवरील महिलांसाठी समूह व एकल नृत्य स्पर्धा झाली. या स्पर्धेचं उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केलं. यावेळी पणन महासंघाचे संजय खाडे, शामा तोटावार उपस्थित होते. समूह नृत्यस्पर्धेत प्रथम पारितोषिक अंबे गृपला मिळालं. दिव्तीय पारितोषिक आम्रपाली गृप तर तृतीय पारितोषिक जिल्हा परिषद शिक्षक गृपला मिळालं.
एकल नृत्य स्पर्धेत मेघा मड़ावी प्रथम आल्यात. दिव्तीय स्थानावर रचना किनाके तर तृतीय स्थानावर प्रियंका घाने आल्यात. याप्रसंगी विविध क्षेत्रांत उलेखानिय कार्य करणाऱ्या शुभांगी मुंघाटे, समीर सय्यद, विनोद आदे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक जुनेजा, प्रतिभा डाखरे, किशोर पाटील, गजानन जयस्वाल, मिलिंद डोहणे यांनी अथक परिश्रम घेतले.
Comments are closed.