वणीत चोर झालेत पुन्हा शिरजोर

पुन्हा दुचाकी चोरी, चोरींच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ

विवेक तोटेवार, वणी: एकेकाळी सांस्कृतिक नगरी अशी वणीची ओळख होती. आता मात्र चोरी, अपघात आणि विविध गुन्हांच्या काळिमा शहराला लागत आहे. त्यातही अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक घटना पुन्हा समोर आली. शहरातील जैन ले आऊट येथे घरासमोर दुचाकी लावलेली होती. नेहमीप्रमाणेच सगळे निवांत झोपलेत. कुणालाच काही अघटीत घडेल असं वाटलं नाही. नेमका तिथंच चोरट्यांनी डाव साधला. बुधवार दिनांक 13 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली.

फिर्यादीने पोलिस स्टेशन गाठलं. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ललित मोहन ढेंगळे यांनी रात्री 12.30 वाजताच्या सुमारास आपली स्प्लेंडर कंपनीची जवळपास २० हजार रूपये किमतीची दुचाकी क्रमांक MH 31 BF 7133 आपल्या घराजवळ लावली. सकाळी त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. नेहमी जागेवर असणारी दुचाकी त्यांनी दिसून आली नाही. मग त्यांनी आजूबाजूला विचारपूस करून शोध घेतला. तरीही दुचाकीबद्दल त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर ललित यांनी वणी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोहेको सुदर्शन वानोळे करीत आहे.

Comments are closed.