पुरुषोत्तम नवघरे, वणी: आरएसएसची राजकीय संघटना असलेली भाजपचा मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात देशविघातक जन विरोधी कायदे, धोरणे व निर्णय घेत देशाला रसातळाला नेऊन ठेवले. देशावर गेल्या 70 वर्षांच्या तुलनेत तीन पट कर्ज वाढवून देशातील नागरिकांवर प्रचंड कर्जाचे डोंगर उभे करून ठेवले आहे. पेट्रोलियम पदार्थांवर प्रचंड कर लावून डिझेल पेट्रोल व गॅस चे दर वाढवून देशात प्रचंड महागाई आणली आहे, असा आरोप करीत या निवडणुकीत भाजपला धडा शिकवा असे आवाहन माकपतर्फे करण्यात आले. दिनांक 23 मार्च रोजी दिनी शहीद दिनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
शेतकरी विरोधी काळे कायदे करणे, संविधान विरोधी निवडणूक रोखे द्वारे भांडवलदारांकडून प्रचंड निधी उकळणे, ४४ कामगार कायदे रद्द करून भांडवलदार धार्जिणे ४ श्रम संहिता आणून श्रमिकांचे शोषण करण्यासाठी मोकळीक देणे, नवीन शैक्षणिक धोरण आणून सार्वजनिक शिक्षण व्यवस्था संपविणे, सी ए ए कायदा लागू करून धार्मिक मतभेद निर्माण करून विशिष्ठ धर्माला टार्गेट करून त्यांच्यावर अन्याय करणे,
दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देऊ म्हणून निवडणूक जिंकून गेल्या ४० वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी वाढली, शासकीय रिक्त जागा न भरणे, सार्वजनिक उद्योग विकणे, शासकीय जागांचे खाजगीकरण करणे, ई डी, सी बी आय, निवडणूक आयोग, ह्यांचा गैर वापर करून विरोधी पक्षातील लोकांना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट करून त्यांना तुरुंगात टाकने, आदी संविधान विरोधी निर्णय घेऊन भाजपने जनविरोधी कार्य केल्याने ह्या सरकारला सत्तेवरून पायउतार करून येत्या निवडणुकीत ” संविधान बचाव, लोकशाही बचाव, देश बचाव” असे आवाहन निवेदनातून करण्यात आले.
यावेळेस कुमार मोहरमपुरी, ऍड. दिलीप परचाके, मनोज काळे, नंदू बोबडे, सुधाकर सोनटक्के, कवडु चांदेकर, गजानन ताकसांडे, संजय वालकोंडे, संदीप मोहारे, शंकर गाऊत्रे, वाघु सिडाम, संजय कवाडे, प्रीति करमरकर, किरण बोंसूले, वंदना ठाकरे, दिनकर सरोदे, लालू दडांजे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
Comments are closed.