तलवारीचा धाकावर लाखोंचा दरोडा, पटवारी कॉलोनीत मध्यरात्री थरार

दरवाजा तोडून आत प्रवेश. लुटली रोख रक्कम व सोने

विवेक तोटेवार, वणी: तलवारीच्या धाकावर एका घरी धाडसी दरोडा टाकत रोख रकमेसह 13 तोळे सोऩं दरोडेखोरांनी लुटले. गुरूवारी मध्यरात्री (शुक्रवार) पहाटे 3 वाजताच्या सुमारास पटवारी कॉलोनीत ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Podar School 2025

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सुभाष वासुदेव पिदूरकर हे पटवारी कॉलोनी लालगुडा येथील रहिवासी आहे. ते वेकोलितून सेवानिवृत्त झाले असून ते त्यांची पत्नी व मुलीसह राहतात. गुरूवारच्या मध्यरात्री (5 एप्रिल) पहाटे 3 वाजताच्या सुमारास पिदुरकर यांच्या घरी 5 अज्ञात दरोडेखोर दरवाजा तोडून गेले. आवाजामु़ळे घरी असलेले सर्व व्यक्ती जागे झाले. दरोडेखोरांनी त्यांना तलवारीचा धाक दाखवत एका ठिकाणी बंदी केले.

दरोडेखोरांनी त्यांना घरात ठेवलेली रोख रकम तसेच दागिने कुठे ठेवले याची विचारणा केली. घाबरलेल्या पिदुरकर कुटुंबीयांनी रोख रक्कम तसेच सोने ठेवल्याची जागा दाखवली. दरोडेखोरांनी 50 हजार रुपये कॅश व सुमारे तेरा डोळे सोनं लुटून घरून पळ काढला.

घाबरलेल्या पिदुरकर कुटुंबीयांनी तात्काळ आरडाओरड करत आजूबाजूच्या लोकांना उठवले व पोलिसांना फोन केला. घटनेची माहिती होताच डीबी पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. यालुटीत सुमारे सात ते आठ लाखाचा ऐवज चोरून नेल्याच्या प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा तपास पोलीस करीत आहे

Comments are closed.