बहुगुणी डेस्क, वणी: ओव्हरटेक करताना दुचाकीचे नियंत्रन सुटून कोळसा वाहतूक करणा-या एका ट्रकचा व दुचाकीला भीषण अपघात झाला. यात एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेत. रविवारी दिनांक 19 मे रोजी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास बेलोरा फाट्याजवळ हा अपघात झाला. जीत उर्फ मुन्ना अजय गोवर्धन (अंदाजे 18) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात जीतचा मित्र हर्षल अर्जूनकर व प्रणय शंकर नवले हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त माहिती नुसार, जीत हा मुरसा ता. भद्रावती येथील रहिवासी होता. तो रविवारी भद्रावतीवरून नायगाव ता. वणी येथे त्याचा मित्र हर्षल व प्रणयसह (दोघेही राणार मुरसा) होन्डा लिओ या दुचाकीने (MH34 BQ2947) ट्रीपलसीट लग्न समारंभासाठी येत होते. संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास वणीकडे एक ट्रक (MH34 BG3783) कोळसा भरून जात होता.
या ट्रकला ओव्हरटेक करताना चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व त्यांची दुचाकी खाली पडली. दरम्यान चालक जीत हा ट्रकच्या चाकाखाली आला. तर मागे बसलेले दोघे रोडच्या कडेला फेकले गेले. चाकाखाली आल्याने जीतचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे दोन्ही सहकारी डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले. अपघात होताच घटनास्थळावरील लोकांनी याची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले.
दोन्ही जखमींना चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर जीतचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.