गर्लफ्रेंडने केले ब्रेकअप, एक्सची नवीन बॉयफ्रेंडला मारहाण

बॉयफ्रेंड जखमी, आरोपी एक्सविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: गर्लफ्रेंडचे एकाशी सुत जुळले होते. मात्र दोघात होणा-या सततच्या वादामुळे त्यांचे ब्रेकअप झाले. मुलीने दुसरा बॉयफ्रेंड शोधला. मात्र मुलीच्या एक्सला ही बाब काही रुजली नाही. त्याने अधिकार गाजवत एक्सच्या बॉयफ्रेंडला बेदम मारहाण केली. याबाबत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मारहाण झालेला फिर्यादी बॉयफ्रेंड हा 19 वर्षाचा असून तो वणीतील रहिवासी आहे. तो एका कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. तर आरोपी हा 20 वर्षांचा आहे. दोघे एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांची ओळख आहे. फिर्यादी बॉयफ्रेंडचे एक महिन्यापासून एका मुलीशी सूत जुळले आहे. मात्र या मुलीची आधी आरोपीसोबत मैत्री होती. सातत्याने होणा-या भांडणामुळे त्या दोघांनी ब्रेकअप केले. त्यानंतर ती फिर्यादीच्या संपर्कात आली.

रविवारी दिनांक 2 जून रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास फिर्यादी मुकुटबन रोडवरील काटे ले आउट मधून त्याच्या वडिलांसोबत जात होता. दरम्यान त्याला आरोपीने गाठले व त्याला माझ्या गर्लफ्रेंडसोबत का बोलतो? असा जाब विचारला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. आरोपीने एक्सच्या बॉयफ्रेंडला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने हातातील कड्याने डोक्याला मारहाण केली. त्यामुळे बॉयफ्रेंडचे डोके फुटले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मध्ये फिर्यादीचे वडील आले असता त्यांना देखील मारहाण केली असे तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीनंतर मुलगा आणि वडिलांनी पोलीस स्टेश गाठत याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरोधात भादंविच्या कलम 323, 324 व 504 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.