बहुगुणी डेस्क, वणी: नागपूरहून-अदिलाबादच्या दिशेने येणा-या रेल्वेने एका वृद्धाला चिरडले. यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. कोना जवळील रेल्वे पुलाजवळ हा अपघात झाला. महादेव परचाके (71) असे मृताचे नाव आहे. ते कोना येथील रहिवासी होते. आज मंगळवारी दिनांक 9 जूलै रोजी दुपारी महादेव हे कामानिमित्त माजरी येथे गेले होते. तिथून ते रेल्वेच्या रुळावरून कोना या आपल्या गावी परतत होते. दरम्यान गावाजवळील रेल्वेच्या पुलावरून जात असताना याच वेळी नागपूरहून धनबाद-कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस अदिलाबादच्या दिशेने येत होती. या रेल्वेची त्यांना धडक बसली. रेल्वेखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महादेव हे कोना गावाचे माजी सरपंच होते.
नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा
माजरी पासून पिंपळखुटी पर्यंत ट्रेनची स्पीड वाढली आहे. सध्या ही स्पीड ताशी 80 पेक्षा अधिक झाली आहे. वेगाचा अंदाज न आल्याने सध्या रुळावर किंवा रुळाशेजारी चरत असलेल्या अनेक पाळीव जनावरांना देखील रेल्वेची धडक बसत आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे रुळापासून दूर राहावे, तसेच जनावरांनाही रेल्वे रुळापासून दूर ठेवावे, असे आवाहन रेल्वे विभाग वणी तर्फे करण्यात आले आहे.
त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोन दिवसांआधीच गणेशपूर जवळील रेल्वे पुलावर एका रेल्वेची तरुणाला धडक बसली होती. त्यानंतर ही दुसरी घटना आहे.
Comments are closed.