शेतात राडा, मुलीच्या डोळ्यात तिखट फेकून विळ्याने हल्ला

दोन महिला मजुरांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: शेतात काम करीत असलेल्या आईचा डब्बा घेऊन गेलेल्या मुलीच्या डोळ्यात तिखट फेकून तिच्यावर विळ्याने हल्ला करण्यात आला. शेजारच्या शेतातील 2 महिला मजुरांनी हा हल्ला केला. मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी हल्ला करणा-या महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी या 40 वर्षांच्या असून मांगरुळ ता. मारेगाव येथील रहिवासी आहे. त्या पती व त्यांच्या दोन मुलींसह राहतात. त्या शेती करतात. त्यांच्या शेजारीच त्यांच्या दिराचे शेत आहे. दिनांक 31 जुलै रोजी सकाळी त्या, त्यांचे पती व आणखी एका सहकारी महिलेसह शेतात निंदण करायला गेल्या होत्या.

शेजारच्या शेतात त्यांच्या दिराच्या पत्नी या तीन महिला मजुरांसह निंदण करीत होत्या. दुपारी दोन वाजताच्या सुमारास फिर्यादीची मुलगी (19) ही डब्बा घेऊन शेतात आली. त्यावेळी धु-यावरील दिराच्या शेतात काम करीत असलेल्या दोन महिला मुजरांनी फिर्यादीच्या मुलीच्या डोळ्यात तिखट फेकले. त्यानंतर एकीने मुलीला पकडले तर दुसरीने विळ्याने मुलीच्या मानेवर विळ्याने हल्ला केला. तसेच शिविगाळ करीत मारहाण केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या हल्ल्यात मुलगी घटनेनंतर मुलीच्या आईने मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. तक्रारीवरून 2 महिलांवर बीएनएसच्या कलम 115(2), 118 (1), 3 (5), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Comments are closed.