निकेश जिलठे, वणी: बरोबर एक महिन्याआधी संजय खाडे यांच्या पुढाकारातून लोकांच्या विविध शासकीय कामासाठी ‘चालतं फिरतं जनहित केंद्र’ सुरु करण्यात आले. या जनहित केंद्राद्वारे अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत हजारो लोकांचे कामे झाली आहेत. केंद्राच्या मदतीमुळे शेकडो लोकांची अनेक रखडलेली कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हे जनहित केंद्र केवळ लोकप्रियच ठरले नाही, तर लोकांसाठी ते वरदानदेखील ठरत आहे. त्यामुळे जनहित केंद्र हा संजय खाडे यांचा एक मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.
दिनांक 4 जुलै रोजी खाती चौक येथे ‘चालतं फिरतं जनहित केंद्र’ सुरु करण्यात आले. शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्यासाठी या जनहित केंद्राद्वारे तांत्रिक मदत केली जाते. यात योजनेचा लाभ कसा घ्यावा, कोणते कागदपत्रे जोडावी, ऑनलाईन फॉर्म भरून देणे इत्यादी मदत या जनहित केंद्राद्वारे केली जाते. या जनहित केंद्राद्वारे पीक विमा, लाडकी बहिण योजना, आरटीईचे फॉर्म याशिवाय विविध योजनेसाठी सर्वसामान्यांना मदत करण्यात आली. लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरून देण्याचे काम तर 24 तास शिफ्टमध्ये सुरु होते. त्यामुळे हजारो महिलांचे फॉर्म याद्वारे भरण्यात आले.
हे जनहित केंद्र 24 तास सुरु असते. फक्त एक कॉल केल्यावर त्या ठिकाणी हे मोबाईल जनहित केंद्र पोहोचते व लाभार्थ्याना सर्व ती मदत करते. सध्या जनहित केंद्राच्या 3 टीम कार्यरत असून 1 टीम संपूर्ण वेळ खाती चौक येथील कार्यालयात हजर असते. तर दोन टीम या नागरिकांच्या कॉलवर विविध गावखेड्यात जाऊन सेवा देत आहेत. योजनेच्या लाभासाठी कागदपत्रांची कमतरता असेल तर जनहित केंद्राची टीम ही कागदपत्रे काढण्यास देखील मदत करते.
विविध शासकीय कामांच्या मदतीसाठी दिवसभरात शेकडो लोकांची खाती चौक येथील जनहित केंद्रात भेट देतात. संजय खाडे हे स्वत: अनेक वेळा या केंद्रात उपस्थित असतात. ते गावक-यांच्या समस्या जाणून घेतात. या संदर्भात केंद्रात आलेल्या एका गावक-यांशी बोलले असता त्यांनी गर्दी असली तरी काम अचूक आणि वेळेत होते. सध्या शेतीचे काम सुरु आहे. केंद्रात अवघ्या काही वेळातच काम झाले. त्यामुळे एका कामासाठी पुन्हा वणीला येण्याची गरज पडली नाही, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.
रखडलेली पीक विम्याची रक्कम मिळाली
केंद्राचे काम केवळ लोकांचे फॉर्म भरून देण्यापुरते मर्यादीत नाही. जर लाभार्थ्याला मदत मिळण्यास अडचण येत असेल तर त्याचा शासनदरबारी पाठपुरावा देखील केला जातो. दोन वर्षाआधी वर्धा नदीला महापूर आला होता. यात शेकडो शेतक-यांच्या शेतीचे नुकसान झाले होते. शासनाने याचे पंचनामे केले होते. मात्र पीक विम्याची रक्कम काही तांत्रिक अडचणीमुळे रखडली होती. ही बाब काही शेतक-यांनी हेल्पलाईनद्वारा जनहित केंद्राला कळवली. शेतक-यांची ही समस्या ओळखून संजय खाडे स्वत: टीमसह पूरग्रस्त गावातील प्रत्येक शेतक-यांच्या घरी गेले. त्यांनी कागदपत्रे गोळा केली. रक्कम मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. परिणामी शेतक-यांना पीक विम्याची रखडलेली रक्कम मिळाली. ज्या रकमेची शेतक-यांनी आशा सोडली होती, ती रखडलेली रक्कम मिळणे ही या जनहित केंद्राचे सर्वात मोठे यश मानले जात आहे.
लोकसेवा हेच कार्य – संजय खाडे
लोकसेवा हेच प्रत्येक समाजकारणी, राजकारण्याचे कर्तव्य असते. त्यामुळे आमच्या संपूर्ण कामाचा फोकस हा लोकसेवेकडे असतो. आधी लोकसेवा नंतरच राजकारण या तत्वावर आमचे काम सुरु आहे. खा. प्रतिभा धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात आमचे कार्य सुरु आहे. चालतं फिरतं जनहित केंद्राचा सर्वसामान्यांना फायदा होत आहे, याचे समाधान आहे. या पुढेही असेच अनेक लोकहितोपयोगी उपक्रम परिसरात राबवले जाणार आहे. – संजय खाडे, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस
जनहित केंद्राची मदत घेण्यासाठी फक्त 9637375455 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा लागतो. किंवा खाती चौक येथील जनहित केंद्रात भेट द्यावी लागते. हेल्पलाईनवर कॉल केल्यानंतर तात्काळ केंद्राची टीम ज्या ठिकाणी गरज आहे. त्या ठिकाणी सर्व यंत्रणा घेऊन पोहोचते. घरबसल्या केवळ एका कॉलवर लोकांना सेवा मिळत आहे. तसेच खाती चौक येथील केंद्रात देखील लोकांना सेवा मिळत आहे. तात्काळ व अचूक सेवा यामुळे हे केंद्र चांगलेच लोकप्रिय झाले आहे. त्यामुळे हा संजय खाडे यांचा मास्टरस्ट्रोक ठरत असल्याचे बोलले जात आहे.
Comments are closed.