वणीत रविवारी भव्य महाआरोग्य (सर्वरोग निदान व उपचार) शिबिराचे आयोजन

भाजप वणी विधानसभातर्फे आयोजन, सावंगी येथील चमू करणार रुग्ण तपासणी

बहुगुणी डेस्क, वणी: रविवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी वणीतील लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल, नांदेपेरा रोड येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स. 10 ते दु. 3 वाजे पर्यंत हे शिबिर होणार असून हे शिबिर नि:शुल्क आहे. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) येथील चमू रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. सेवा पंधरवाडा, पं. दिनदयाल उपाध्याय व वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप वणी विधानसभातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात वणी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.

शिबिरात सर्व रोगांचा समावेश
शिबिरात रक्तदाब, ब्लड शुगर, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, छातीत दुखणे, धाप लागणे, डोळ्यांचे सर्व आजार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा, हायड्रोसिल, हर्निया, आतडे व मुतखड्याचे आजार, पोटाचे आजार, गलगंड (थायरॉईड), महिलांचे विविध आजार आजार, हृदयाला छिद्र असणे, गतिमंद, मुलांच्या विकारासंबंधी आजार, लहान मुलांचे सर्व आजार, कान नाक घशाचे सर्व आजार, संधिवात, वाकलेले पाय, फॅक्चरसह हाडांचे सर्व आजार, खाज, गचकर्ण, अंगावरील पांढरे डाग, त्वचेचे विविध आजार, दमा, तोंडावाटे पडणारे रक्ताचे ठसे इत्यादी आजारावर मोफत तज्ञ डॉक्टरांकडून निःशुल्क तपासणी व उपचार होणार आहे.

भरती रुग्णांना सर्व सामान्य चाचण्या उदा. (एक्स-रे, रक्त, लघवी चाचणी, सोनोग्राफी) महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी मोफत केली जाणार आहे. अतिविशिष्ट चाचण्या (CT Scan, MRI इत्यादी चाचण्या) आवश्यकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत केली जाणार आहे. शिबिरात मेडिसिन तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, सर्जरी तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नाक, कान व घसा तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, श्वसनरोग तज्ज्ञ रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. शिबिरामध्ये येताना रुग्णांनी आधार कार्ड व राशन कार्ड सोबत आणावे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार घेण्यासाठी रेशन कार्ड वर नाव असलेल्या सर्व लोकांचे आधार कार्ड आणावे लागणार आहे.

अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
जवळपास सर्व रोगांचे निदान व उपचार या शिबिरात केले जाणार आहे. कॅन्सर, फाटलेले ओठ, दुभंगलेला टाळू (जांभाड) तसेच जन्मतः असलेल्या मुखविकृतीवर शस्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. तर गुडघे व कंबरेच्या सांध्याचे प्रत्यारोपण व इतर शस्त्रक्रिया या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास मोफत होणार आहे. विशेष म्हणजे भरती रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता वाहनांची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. त्यामुळे या शिबिराच वणी विधानसभा क्षेत्रातील अधिकाधिक रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
– संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार वणी विधानसभा क्षेत्र

नोंदणी करीता संपर्क – 9028095997, 9823304087, 9767899040,8208228280, 8308313956, 3200985,9665828291, 8855847232, 9552299300, 9372162636, 8411047174 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments are closed.