आज सुप्रसिद्ध, ट्रेंडिंग कीर्तनकार सोपान कणेरकर यांचे वणीत व्याख्यान

शेतकरी मंदिर येथे दु. 1 वा. आयोजन, कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे विजय चोरडिया यांचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पारसमल प्रेमराज फाउंडेशनच्यावतीने येथे शनिवारी (दि. 28) दुपारी 1 वाजता शेतकरी मंदिराच्या सभागृहात कीर्तनकार सोपान कणेरकर यांचे ‘युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन व पालकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. सोपान कणेरकर आपल्या प्रबोधनातून विद्यार्थी व पालकांना भागवतगीतेद्वारे आवडेल त्या भाषेत यशाचा कानमंत्र देतात. वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेसाठी हे व्याख्यान म्हणजे एक पर्वणीच असणार आहे. या जाहीर व्याख्यानाला वणी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांनी केले.

Comments are closed.