मध्यरात्री दारू पिऊन गोंधळ घालणा-या इसमाला अटक

वणीतील गंगाविहार येथील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: मध्यरात्री दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणा-या एका इसमाला वणी पोलिसांनी अटक केली. सोमवारी दिनांक 7 रोजी मध्यरात्री गंगाविहार येथे ही घटना घडली. रात्री बारा वाजताच्या सुमारास वाजताच्या सुमारास वणी पोलीस पोलिसांना गंगा विहार परिसर येथून माहिती मिळाली की या परिसरात एक व्यक्ती दारू पिऊन गोंधळ घालत आहे. त्यावरून पोलिसांची चमू गंगा विहार परिसरात गेले. तिथे त्यांना राजेंद्र अरुण खोब्रागडे (42) रा. भीमनगर वणी हा दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड व असभ्य वर्तन करताना आढळला. पोलिसांनी राजेंद्रला ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. मेडिकल रिपोर्टमध्ये तो दारू पिलेला आढळला. त्यावरून पोलिसांनी राजेंद्र विरोधात बीएनएसच्या कलम 85 (1) नुसार गुन्हा दाखल केला. 

Comments are closed.