राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सात्विक बच्चेवार यांचे सुयश

पुणे येथील स्पर्धत पटकावले ब्रॉन्झ मेडल

विवेक तोटेवार, वणी: वणी येथील रहिवासी असलेले सात्विक देवेंद्र बच्चेवार याने बालेवाडी पुणे येथे झालेल्या कराटे स्पर्धेत ब्राँझ मेडल पटकाविले. महाराष्ट्र ऑलिम्पिक अससोसिएशन मान्यताप्राप्त महाराष्ट्र कराटे असोसिएशन द्वारा 27, 28 व 29 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय कराटे निवड स्पर्धा बालेवाडी पुणे येथे घेण्यात आली. या स्पर्धेत सात्विक देवेद्र बच्चेवार वजन गट अंडर 14 वजन अंडर 50 किलो गटात ब्राँझ मेडल पटकावले. सात्विक हा स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असून तो सातव्या वर्गात शिक्षण घेतो. त्याला कराटे सोबत कबड्डी, क्रिकेट व्हॉलीबॉल खेळण्याचाही छंद आहे. यापूर्वी त्याने आंध्रप्रदेश व तेलंगणा येथे झालेल्या कराटे स्पर्धेत मेडल पटकाविले आहे. सात्विक आपल्या यशाचे श्रेय आपले आई, वडील शाळेचे शिक्षक व प्रशिक्षक सिद्धार्थ सोनारखन यांना देतो. राज्य स्तरीय स्पर्धेत मिळालेल्या यशाचे वणीकरांकडून कौतुक होत आहे.

Comments are closed.