9 व्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनी घरून निघून गेली

फूस लावून पळवून नेल्याचा संशय

विवेक तोटेवार, वणी: 9 व्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी (15) बेपत्ता झाली. दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेले असा तिच्या पालकांना संशय आहे. त्यावरून मुलीच्या पालकांनी वणी पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलगी ही वणीतील एका शाळेत 9 व्या वर्गात शिकते. ती शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घरी कुणाला काहीही न सांगता निघून गेली. मात्र संध्याकाळपर्यंत ती घरी आली नाही. तिच्या पालकांना ती मैत्रिणीकडे गेली असावी असा समज झाला. मात्र रात्री झाली तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या भावाने आणि वडिलांनी तिचा मैत्रिणी व नातेवाईकांकडे शोध घेतला. पण तिच्याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. मुलीच्या पालकांना तिला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Comments are closed.