बहुगुणी डेस्क, वणी: एका दुचाकीने दुस-या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. यात एक दुचाकीस्वार जखमी झाला. तालुक्यातील मोहुर्ली येथे ही घटना घडली. आनंद नागो कुमरे (63) असे जखमीचे नाव आहे. आनंद हे मोहुर्लीतील रहिवासी असून ते वणीतील एका गोदामात काम करतात. ते रोज मोहुर्लीहून वणीला त्यांच्या होन्डा शाईन (MH-29 B.S.7180) या दुचाकीने येतात. मंगळवारी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी काम आटोपल्या नंतर आनंद हे गावकडे निघाले. रात्री 8 वाजताच्या सुमारास ते गावातील सरस्वती शाळेजवळ पोहचले. दरम्यान गावातील करण डाहुले (22) याने दुचाकीने आनंद यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातात आनंद यांच्या पायाला दुखापत झाली. गावातील काही लोकांनी आनंद यांना ऑटोत बसवून वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. या प्रकरणी आनंद यांचा मुलगा गणेश यांच्या तक्रारीवरून आरोपी करण डाहुले विरोधात बीएनएसच्या कलम 125(a) व 281 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.