बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळी निमित्त रेस्टॉरन्टची साफसफाई करताना करंट लागल्याने हॉटेल मालकाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. शाहिद खान वाहिद खान (45) असे मृताचे नाव आहे. ते वणीतील गुरुनगर येथे राहत होते. त्यांचे ग्रामीण रुग्णालयासमोर जनता रेस्टॉरंट नावाने धाबा आहे. शुक्रवारी ते रेस्टॉरंटमधील स्टॉफसह दिवाळी निमित्ताने साफसफाई करीत होते. त्यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यांनी रेस्टॉरंटमधील इन्व्हर्टर बाजूला करून त्याचा प्लग काढला. इन्व्हर्टरशी जुळलेला वायर बाजूला करीत असतानाच खंडित विद्युत अचानक सुरू झाला. त्यामुळे वायरमध्ये वीज प्रवाह संचारला. वीज प्रवाहाचा जोरदार करंट लागल्याने शाहीद खान लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.

Comments are closed.