बहुगुणी डेस्क, वणी: आज संजय खाडे यांच्या वणी व ग्रामीण भागातील प्रचाराचा नारळ फुटणार आहे. स. 10 वा. रंगनाथ स्वामी मंदिर येथे वणी शहरातील प्रचाराचा नारळ फुटणार तर 11 वा. विदेही सदगुरू श्री जगन्नाथ महाराज संस्थान भांदेवाडा येथून ग्रामीण भागातील प्रचाराचा शुभारंभ होत आहे. स. 10 वा. जैताई मंदिर, 11.30 वा. वनोजा देवी, 12.30 वा. घोगुलधरा, 1.30 वा. वेगाव व 2.30 वा. वरझडी येथे ते भेट देणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील विविध देवस्थानात जाऊन दर्शनाला जाताना ते या मार्गावरील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
संजय खाडे यांनी निवडणूक लढण्याचे जाहीर केल्यानंतर ते त्वरित कामाला लागले आहे. त्यानंतर विविध गावातील नेत्यांच्या भेटी सुरु आहेत. तसेच अनेक गावातील स्थानिक नेते व कार्यकर्ते त्यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत आहे. त्यांच्या उमेदवारीला माजी आमदार विश्वास नांदेकर, नरेंद्र ठाकरे यांच्यासह अनेक काँग्रेस, शिवसेनेचे अनेक नेते व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्याने त्यांना बळकटी मिळाली आहे
संजय खाडे यांच्या उमेदवारीमुळे आता वणी विधानसभेची निवडणूक चौरंगी होणार आहे. आ. संजीवरेडंडी बोदकुरवार, संजय देरकर, राजू उंबरकर व संजय खाडे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. तर वंचितचे राजेंद्र निमसटकर, कम्युनिस्ट पक्षाचे अनिल हेपट व बसपाचे अरुणकुमार खैरे हे उमेदवार देखील शर्यतीत आहे.
Comments are closed.