विवेक तोटेवार, वणी: वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना उबाठा पक्षाचा झंझावात सुरू आहे. मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी संजय देरकर यांनी एकाच दिवशी जवळपास 20 गावात प्रचार केला. कुठे कॉर्नर सभा, कुठे पदयात्रा, तर कुठे गृहभेट घेत त्यांनी त्यांचा प्रचार केला. चिलई येथील प्रचार दौ-यात चिलई येथील सरपंचांनी आपल्या सर्व सदस्यासह शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला चांगलीच बळकटी मिळाली आहे.
विधानसभेत निवडून देण्यासाठी जनतेला विविध आश्वासने देत आपल्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन विविध पक्ष करीत आहेत. वणी विधानसभेत शिवसेनेचे (उबाठा) पक्षाने सर्व शक्ती पणाला लावून प्रचार कार्यात झोकून दिले आहे. मंगळवारी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता संजय देरकर यांचा प्रचार ताफा मंदर या गावात पोहचला. तिथे पोहचताच संजय देरकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावात पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर केसुर्ली या गावात संजय देरकर यांचा प्रचार ताफा पोहोचला.
वॉटर एटीएमसाठी पुटळा हटवल्याचा आरोप
चारगाव येथे त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी गावक-यांनी त्यांच्याशी भेटून गावातील विविध समस्यांवर चर्चा केली. दरम्यान काही गावक-यांनी गावात लावलेला गाडगे महाराजांचा पुतळा हटवून वॉटर एटीएम सुरु केले. त्यामुळे अभिवादन करण्यास अडचण येत आहे. असा आरोप गावक-यांनी केला. देरकर यांनी याचा निषेध करीत निवडून आल्यास गावात गाडगे बाबांचे मोठे स्मारक बांधले जाईल, असे आश्वासन दिले.
शिरपूर येथे प्रचार ताफा पोहोचताच गावक-यांनी फटाके फोडून स्वागत करण्यात आले. शिरपूर येथे भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी शेतक-यांनी संजय देरकर यांची भेट घेत त्यांच्याजवळ शेतमालाच्या कमी भावाबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी शेतकरी महायुती सरकारला धडा शिकवणार अशा विश्वास शेतक-यांनी व्यक्त केला. रॅलीतील सहभागी लोकांनी हाती मशाल विजय विशाल अशी नारेबाजी केली. शिंदोला सर्कलमधील मेंढोली, खांदला, बोरगाव येथेही रॅली काढण्यात आली. अनेक गावकऱ्यांनी संजय देरकर याना आपला पाठिंबा जाहीर केला.
दिवशी दुपारी 2 वाजताच्या सुमारास निंबाळा, ढाकोरी, येथेही रॅली काढण्यात आली. तर कुरई येथे संजय देरकर यांचे फटाक्यांची आतिषबाजी करीत भव्य स्वागत करण्यात आले. वेळाबाई गावात गावकरी महिलांनी त्यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. या गावातही प्रचार रॅली काढण्यात आली. मोहदा, कृष्णानपूर, टुंड्रा, नेरड पुरड, गणेशपूर (खडकी) या गावातही प्रचार रॅली काढण्यात आली. या सर्व गावात गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
चिलईचे सरपंच व सदस्य शिवसेनेत
चिलई या गावाचे सरपंच व भाजपचे समर्थक अनुप बोबडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना (उबाठा) पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला चांगलीच बळकटी मिळाली आहे. सायंकाळी 8 वाजताच्या सुरमास तेजापूर, आमरोन व गाडेगाव या गावात प्रचार रॅली काढण्यात आली.
प्रचार ताफ्यात काँग्रेसचे राजीव कासावार, देविदास काळे, टिकाराम कोंगरे, शिवसेनेचे संजय निखाडे, सुनील कातकडे, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड दिलिप परचाके, कुमार मोहरमपुरी, प्रवीण खानझोडे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गुरुवारी वसंत जिनिंग लॉनमध्ये संजय देरकरांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
Comments are closed.