२० कोटींच्या राज्यमार्गावर नित्कृष्ट दर्जाचे डांबर, गिट्टीचा वापर
झरी (सुशील ओझा): वणी ते मुकुटबन राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. तर हिवरदरा ते खडकीपर्यंतच्या रस्त्याचे कामही अद्याप सुरू आहे. खडकी ते हिवरदरा या चार किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी निकृष्ठ दर्जाचे डांबर व गिट्टीचा वापर करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
गणेशपूर वासियांच्या आंदोलनानंतर हिवरदार ते खडकी या मार्गाचे काम सुरु झाले. हा रोड बॅचमिक्स प्लांटचा डांबरमिक्स गिट्टी वापरून तयार तयार करणे आहे. ज्यामुळे रस्ता मजबूत व टिकाऊ बनते. परंतु ठेकेदार व शासकीय बांधकाम विभागाच्या मुजोर धोरणामुळे कुणालाही न जुमानता बॅचमिक्स ऐवजी हॉटमिक्स डांबरगिट्टीचा वापर करून नित्कृष्ट दर्जेचा रोड बनविणे सुरु आहे. याकडे लोकप्रतिनिधी सह वरिष्ठ अधिकारी झोपेचे सोंग घेऊन आहे.
रस्त्याच्या ठेकेदाराचे बॅचमिक्स प्लांट मोहदा येथे असून प्लांटचे काम संथगतीने सुरू आहे. ज्यामुळे जवळच्या हॉटमिक्स प्लांट मधून डांबरगिट्टी ट्रक द्वारे भरून आणून रोडचे काम करणे सुरु आहे. त्यामुळे हिवरदरा ते खडकी या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप गामस्थ करीत आहे. याबाबत गणेशपूरवासी क्वालिटी कंट्रोल बोर्डकडे तक्रार करण्याच्या तयारीत असून याविरोधात आणखी एक आंदोलन करणार असल्याची माहिती वणी बहुगुणीला ग्रामस्थांनी दिली आहे.