बहुगुणी डेस्क, वणी: वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांना विविध सामाजिक संघटना व विविध समाजातील नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दिनांक 17 नोव्हेंबर रोजी शहरात पदयात्रा काढण्यात आली. दरम्यान शहरातील प्रगती नगर येथे पदयात्रा येताच सामाजिक कार्यकर्ते तथा कुणबी समाजाचे युवा कार्यकर्ते महेश पहापळे यांनी त्यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. तर वणी विधानसभा क्षेत्रात काम करणाऱ्या धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य व विविध सामाजिक संघटनाद्वारा वणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे या निवडणुकीत संजीवरेड्डी बोदकुरवार यांना मजबुती मिळाली आहे.
वणी विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचा मोठा प्रभाव आहे. या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी महायुती शासनाने पूर्ण प्रयत्न बहुतांश समस्या मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे गुरुदेव चिडे, आशिष ढवळे, करण चिडे, शुभम खुजे, आकाश ढवळे, राजू लोणारे, अनिकेत चामाटे आशिष कालर यांच्या सह 25 पदाधिकाऱ्यांच्या साह्य असलेले पत्र आ. बोदकुरवार यांना देण्यात आले.
बिरसा ब्रिगेडचे शेषराव मडावी, अ. भा. विकास परिषदेचे तालुका अध्यक्ष अनिल गेडाम, आदिवासी जन संग्राम संघटसनेचे कार्याध्यक्ष श्रीधर सिडाम यांनी सुद्धा आपापल्या संघटनेचे पाठिंबा देत असल्याबाबतचे पत्र आ. बोदकुरवार यांना देण्यात आले आहे. त्यामुळे या वणी विधानसभा क्षेत्रात संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा जनाधार प्रचंड वाढला आहे.
वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांची ओळख आहे. त्यातच त्यांना विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. २०१४ व २०१९ मध्ये आ. बोदकुरवार यांनी दणदणीत विजय संपादन केला होता. विविध सामाजिक व राजकीय संघटना त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवू लागल्याने त्यांच्या हॅटट्रीककडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.