शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा द्या, शिवसेनेची मागणी

शिवसेना (उबाठा)चे संजय निखाडे यांचे निवेदन

पुरुषोत्त्म नवघरे, वणी: शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुढिल तिन महिने 24 तास वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी केली आहे. रब्बी हंगामात विजेचा अनियमित वीजपुरवठा आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे रब्बी हंगामही धोक्यात आला. सध्या सात दिवस रात्री 8 तास, तर सात दिवस दिवसा 8 तास कृषी पंपासाठी वीज दिली जाते. परंतु दिवसा वीज टिकत नाही, तर रात्री थंडीमुळे पाणी देता येत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून केली जात आहे. त्यामुळे पुढील तिन महिने शेतकऱ्यांना सिंचनासाठी 24 तास विज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची मागणी पुर्ण न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा संजय निखाडे यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी सुधीर थेरे, विलास बोबडे, प्रवीण खानझोडे, आनंद घोटेकर, ज्ञानेश्वर बोबडे, राजेंद्र इद्दे, आकाश आसुटकर आदी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.