महात्मा फुले अभ्यासिका येथे महात्मा फुले पुण्यातिथी निमित्त अभिवादन

शिक्षण ही मानवाची मुलभूत गरज - संजय खाडे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिक्षण ही मानवाची मुलभूत गरज आहे, शिक्षण घेतले तरच जीवन जगण्याला खरा अर्थ आहे; ही शिकवण महात्मा जोतीबा फुले यांनी समाजाला दिली. विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ता, विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्वेने केले. असे महात्मा फुले सांगायचे. जो शिक्षणाचा प्रचार करतो, तोच समाजाचा उद्धार करतो. त्यामुळे शिक्षणाचा अधिकाधिक प्रचार व प्रचार झाला पाहिजे. असे मनोगत संजय खाडे यांनी व्यक्त केले. वणीतील जटाशंकर चौक येथील महात्मा फुले अभ्यासिका येथे महात्मा फुले पुण्यातिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रशांत गोहोकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

संजय खाडे फाउंडेशन संचालित महात्मा फुले अभ्यासिका येथे 28 नोव्हेंबर रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी संजय खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी तसेच शिक्षण व समाजसुधारणेच्या कार्यासाठी संजय खाडे फाउंडेशन सदैव तत्पर राहील, असे वचन खाडे यांनी दिले. प्रशांत गोहोकर यांनी महात्मा फुले यांची समाजसुधारणा, शैक्षणिक कार्याचे महत्त्व आणि आजच्या काळातील शिकवण यावर विचार मांडले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाला सूरज गौरकार, निखिल तुरणकर, अक्षय नालमवार, देवांश आसकर, निखिल गानफाडे, शीतल बोर्डे, कुणाल भेले, आकाश घोरपडे, अनिकेत थेरे, दीपक माडेवार, प्रदीप सातपुते, स्वप्निल सातपुते, विवेक खिरटकर, संतोष ताडुलवार, नीतेश विंचू, अमित काळे, शंकर उपरे, शुभम राठोड, दीपक पथाडे, हर्षल मोहितकर यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे फाउंडेशनचे स्वयंसेवक व अभ्यासिकेचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.