‘प्रणय’ आला रंगात… प्रेयसीची फसवणूक करून गेला जेलात…

बाबू आधी बोलायचा, नंतर टाळायचा... अल्पवयीन प्रेयसीला धोका...

विवेक तोटेवार, वणी: प्रियकर सज्ञान तर प्रेयसी अल्पवयीन. दोघांचे प्रेम बहरत गेले. दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. मात्र आधी लग्नाला हो म्हणून लाडाई गोडाई करणारा प्रेमवीर अचानक बदलला. त्याने लग्नास नकार दिला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलीने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रियकरावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत त्याला बेड्या ठोकल्या.

Podar School 2025

पीडिता ही अल्पवयीन असून ती शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. दरम्यान तिची बोर्डा गावात राहणाऱ्या प्रणय लक्ष्मण मडावी (22) या तरुणाशी ओळख झाली. त्यांचे हळूहळू बोलणे सुरू झाले. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. काही दिवसातच ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले. त्यानंतर ते तासंतास फोनवर बोलायचे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कधी भेट झाली तर तो तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करू लागला. प्रेयसी त्याला नकार द्यायची. मात्र 16 नोव्हेंबर रोजी प्रणयने पीडितेला आपल्या जाळ्यात ओढले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांनी प्रणयच्या वागण्यात बदल झाला. त्याने प्रेयसीशी भेटणे, बोलणे बंद केले. त्याने प्रेयसीला लग्न करण्यासही नकार दिला. आधी लाडाई गोडाई करणारा प्रियकर अचानक बदलला.

प्रेम अचानक तुटल्याने मुलीला धक्का बसला. प्रियकर सातत्याने टाळत असल्याने पीडितेला त्याच्यावर शंका आली. प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे तिच्या लक्षात आले. तिने पालकांसह वणी पोलीस स्टेशन गाठत आरोपी प्रणय विरुद्ध तक्रार दिली. वणी पोलिसांनी कलम 64 (2) 4,6 पोक्सो नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. घटनेचा तपास पाउपनी धनंजय रत्नपारखी करीत आहे.

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964

Comments are closed.