पुरुषोत्तम नवघरे, वणी: विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासाकडेच नाही तर त्यांच्यात दडलेल्या कला व खेळांकडेही लक्ष दिले पाहिजे. कलेमुळे जीवन समृद्ध होते तर खेळांमुळे शारीरिक स्वास्थ चांगले राहते. दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे देखील आवश्यक आहे. असे प्रतिपादन आमदार संजय देरकर यांनी केले. ते वणी नगर परिषदेच्या शताब्दी वर्षी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत नगर पालिकांच्या शाळांच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी आ. संजय देरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 7 मध्ये दिनांक 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजित या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, उपमुख्याधिकरी जयंत सोनटक्के, प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, नितेश राठोड, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा योगिता निंबाळकर, संभाजी वाघमारे, जितेंद्र पाटील, वसंत आडे , दिलीप कोरपेनवार हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी केले. शाळा क्रं. 7 च्या विद्यार्थिनींच्या स्वागत नृत्यानंतर अतिथिंच्या हस्ते ध्वजारोहण , क्रीडा ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांनी खेळाडूंच्या पथकाचे निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. क्रीडा सचिव विजय चव्हाण यांच्या अभिभाषणानंतर प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे यांनी खेळाचे महत्व सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. मुख्याधिकारी डॉ. गाडे यांनी अतिशय शिस्तबध्द आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन केले. करून खास कर्मचाऱ्यांसाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या.
अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी नितीशकुमार हिंगोल यांनी शिक्षण घेण्यासाठी मातृभाषा ही सर्वोत्तम भाषा असून त्यामुळे विद्यार्थी समजपूर्वक शिकून पुढे जातो असे सांगून ते स्वतः जिल्हा परिषदेच्या मराठीतून शिकल्याचे अभिमानाने सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे पदवीधर शिक्षक चंदू परेकर यांनी केले. आभार प्रदर्शन क्रीडा महोत्सवाचे सहसचिव देवेंद्र खरवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर, जयप्रकाश जय सुर्यवंशी, दिगांबर ठाकरे सोनू लांडे, शुभम बहादे यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed.