त्याने स्टाईल मारली कडक; रस्त्यावरच्या पोरींना मारली धडक

कॉलेजमधून परतणा-या तिघींना बाईकने उडवले, एक विद्यार्थीनी गंभीर

बहुगुणी डेस्क, वणी: फिल्मी स्टंट करण्याच्या नादात आजची तरुणाई काहीही करू शकते. बाईक म्हणजेच दुचाकी हे केवळ त्यांच्यासाठी वाहन राहिलं नाही. तर ते त्याचा वापर ‘स्टाईल’ मारण्यासाठीदेखील करतात. मात्र हे प्रकार करताना कोणाच्या जिवाला धोका होऊ शकतो. याचं साध भानदेखील ही युवा पिढी ठेवत नाही. असाच काहीसा विचित्र प्रकार मारेगावातील वर्दळीच्या ठिकाणी घडला. एका भरधाव बाईक स्वाराने कॉलेजमधून पायी परतणा-या तीन विद्यार्थीनींना धडक दिली. यात दोन विद्यार्थीनी जखमी तर एक विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. शनिवारी दिनांक 19 एप्रिलला दुपारी 4 वाजताच्या सुमारास रंगनाथ स्वामी बँकेजवळ ही घटना घडली.  

तक्रारीनुसार, जळका येथील सलोनी (19), केळापूर तालुक्यातील कोठोडा इथली निकीता (20), वणी तालुक्यातील पुरड येथील दिव्याणी (20) व पुरड इथलीच रुतिका (20) या चार मैत्रिणी मारेगावला शिक्षण घेत आहेत. कॉलेज संपल्यानंतर दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्या नेहमी प्रमाणे बस स्टॉपकडे जात होत्या. रस्त्याच्या डाव्या बाजूनं चालत असताना रंगनाथ स्वामी बँके जवळ त्यांच्या समोरून एक भरधाव होंडा शाईन (मो.सा.क्र MH29BW 8146) बाईक आली. भरधाव व अनियंत्रित वाहन चालवणा-या बाईकस्वाराने या मुलींना धडक दिली.

यात दोन मुली किरकोळ जखमी झाल्यात तर निकीता हिच्या डोक्याला, उजव्या पायाला आणि कमरेला जास्त मार लागला. अपघातानंतर जखमीची साधी विचारपूस न करताच बाईकचालक तिथून पळून गेला. अपघात झाल्याचे लक्षात येताच जवळ असलेले स्थानिक नागरिक धावून आलेत. त्यांनी जखमी विद्यार्थीनींना रुग्णालयात नेलं. लगेच पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. या अपघातात सलोनी आणि दिव्याणीला किरकोळ मार लागल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली.

निकीता रा. कोठोडा ता. केळापूर ही गंभीर जखमी झाल्याने तिला तात्काळ उमरी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र नंतर डॉक्टरांनी तिला नागपूर येथील एका खासगी दवाखान्यात रेफर केलं. दरम्यान बाईक चालकाची ओळख पटली. सदर बाईकचालक हा घोडदरा येथील असून त्याचे नाव किशोर कवडू घागी (23) असल्याचे समोर आले. या प्रकरणी फिर्यादी सलोनी हिने मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तिच्या जबानी रिपोर्ट व मेडिकल सर्टिफिकेटवरुन संशयीत किशोर कवडु घागी विरोधात कलम 281, 125 (a), 125(b) BNS अन्वये गुन्हे दाखल झालेत. पुढील तपास पोहेकॉ आनंद अलचेवार करीत आहेत.

फिल्मीस्टाईल आयडिया वापरून मुलगी घरून फुर्र…

काकूच्या मदतीसाठी आलेल्या अल्पवयीन पुतणीला पळवून नेले

आईच्या तेरवीच्या दिवशीच मुलाचा मृत्यू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.