विवेक तोटेवार, वणी: मारेगाव येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी नरेंद्र ठाकरे यांची निवड करण्यात आली. रविवारी दिनांक 4 रोजी पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत त्यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. तर दिगंबर मस्की उपाध्यक्ष, महेंद्र बोथरा सचिव, सुभाष ठावरी सहसचिव, नाशिक मत्ते यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शेतकरी शिक्षण संस्था ही मारेगाव येथील प्रतिष्ठीत संस्था असून या संस्थेद्वारा कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय चालवले जाते.
दिनांक 27 रोजी शेतकरी शिक्षण संस्थेच्या सन 2025 पासून पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक झाली. यात 17 संचालकाच्या कार्यकारी मंडळासाठी 21 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे निवडणुकीत दोन पॅनल तयार झाले होते. या निवडणुकीत महादेव पोल्हे, दौलत झाडे, तेजकरण बोरा, देवराव किन्हेकर, रामचंद्र सयाम, सय्यद वायद अली, सुभाष ठावरी, दिगांबर मस्की, देवराव जेणेकर, बोजारेड्डी चित्तलवार, नाशिक मत्ते, वामनराव कासावार, नानाजी खंडाळकर, महेंद्र बोथरा, सुधीर दामले, नरेंद्र ठाकरे हे विजयी झालेत.
सूर्यभान मत्ते हे ईश्वर चिठ्ठीने विजयी झाले. त्यांना व भास्कर ढवस यांना समान मते मिळालीत. तर भास्कर ढवस, ज्ञानेश्वर कातकडे, हरिश सिडाना, मनोहर किन्हेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. शेतकरी शिक्षण संस्थेची सण 1984 साली स्थापना झाली. या संस्थेद्वारा 1989 साली पहिले सिनियर कॉलेज उघडण्यात आले. या शिक्षण संस्थेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते.


Comments are closed.