बहुगुणी डेस्क, वणी: शहरात वाहतुकीची शिस्त कुणालाच राहिली नाही. त्यातही लग्न किंवा अन्य मिरवणुकींनी ही शिस्त बिघडते. त्यातून छोटे-मोठे अपघात घडतात. वादही होतात. असाच वाद सोमवारी सिद्धी विनायक मंगल कार्यालयाच्या मार्गावर झाला. त्यात आरोपीने फिर्यादीचा चक्कच दातच पाडला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांविरोधात वणी पोलिसांत तक्रार केली.
तक्रारीनुसार गणेशपुरच्या मंगलम विहारमध्ये माजी सैनिक शंकर श्रावण थेरे (36) आई-वडील व पत्नी असे कुटुंबासह राहतात. त्यांची पत्नी गर्भवती असल्याने त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात व्हिजिट असते. नेहमीप्रमाणे सोमवार दिनांक 5 मे रोजी तपासणी व उपचार करायला ते पत्नीसह दुचाकीने डॉक्टरकडे गेलेत. तिथून दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ते घरी परतायला निघालेत. सिद्धी विनायक मंगल कार्यालयाच्या मार्गावरून तेव्हा एक वरात जात होती. त्यांच्या पल्सर (MH29BG5160) गाडीसमोरच एक कार (MH29C30497) चालत होती.
तेव्हा त्या कारचालकाने अचानक गाडी रिव्हर्समध्ये मागे घेतली. दरम्यान शंकर थेरे कारचालकाला हॉर्न व आवाज देत होते. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने कारची थेरे यांच्या पल्सर बाईकला धडक लागली. या धडकेने थेरे यांची पत्नी गाडीवरून खाली पडल्यात. तेव्हा त्यांनी बाईक बाजुला उभी केली. ते आपल्या पत्नीला सांभाळत होते. तेवढ्यात कारचालक गाडीतून खाली उतरला. थेरे यांच्या पत्नीला व त्यांना धक्कबुक्की केली. तिथून निघण्याचा इशारा केला. अश्लिल शिवीगाळ सुरू केली. जिवे मारण्याची धमकीही दिली. तिथलाच दगड फेकून मारला. त्यामुळे डाव्या बाजुच्या दात व दाढेला दुखापत झाली.
आरोपी सुरेश भुवाजी आसुटकर (57) विरुध्द वणी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला. जबानी रिपोर्टनुसार आरोपीवर कलम 351(2) 281, 125(a), 351(3), 296 अन्वये गुन्हे दाखल झालेत. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत. या प्रकरणी आरोपी सुरेश भुवाजी आसुटकर यांनी देखील शंकर यांनी कारची काच फोडली व मारहाण केली अशी तक्रार दिली आहे.
Comments are closed.