बहुगुणी डेस्क, वणी: बसमध्ये चोरी झाली, पाकीट मारलं तर ती सरळ पोलीस ठाण्यातच नेतात. मात्र या प्रकरणात यातलं असं काहीच झालं नव्हतं. बुधवार दिनांक 21 मे रोजी सायंकाळी 5.30च्या दरम्यान चंद्रपूरहून वणीला निघालेली एसटी बस स्टॅण्डवर न नेता थेट पोलीस स्टेशनलाच पोहचली. प्रवासी आणि आजुबाजुचेही सगळे हे कौतुकमिश्रित औतुस्क्यानं पाहत होते. नेमका प्रकार काय सुरू आहे, हे कोणालाच कळेना. एक महिला प्रवास्यानं महिला बस कंडक्टरसोबत घातलेला वाद थेट ठाण्यात पोहचलं. मग जेव्हा सत्य बाहेर आलं, तेव्हा सगळ्यांचेच चेहरे पाहण्यासारखे झाले होते.
तक्रारीनुसार, फिर्यादी वर्षा प्रभाकर सिडाम (35) या सदाशिवनगर, चिखलगाव येथील रहिवासी असून त्या एस. टी. महामंडळच्या वणी आगारात मागील दोन वर्षांपासून वाहक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवार दिनांक 20 रोजी त्या वणी आगार येथे ड्युटीसाठी हजर झाल्यात. दुपारी 03.30 वाजण्याच्या सुमारास त्या चालकासह बसने (MH-40 AQ 6092) वणी ते चंद्रपूर येथे रवाना झाल्या. सायंकाळी 05.30 वाजण्याच्या सुमारास हीच बस चंद्रपूर येथून वणी येथे परत येणार होती.
दरम्यान या बसमध्ये एक महिला प्रवासी चंद्रपूर येथून वणी करिता जाण्यासाठी बसमध्ये बसली. तेव्हा कंडक्टर वर्षा प्रभाकर सिडाम यांनी तिला चुकून चंद्रपूर ते वरोरा स्टॉपचं तिकीट दिलं होतं. हे लक्षात येताच वरोरा येथे पोहचल्यावर कंडक्टरनं त्यांना ते लक्षात आणून दिलं. आता तुम्ही वरोरा ते वणी तिकीट काढा असं त्यांनी महिलेला म्हटलं. त्यानंतर त्यांनी त्या महिलेला वरोरा ते वणी करिता तिकीट दिलं. त्या तिकिटाचे 42 रूपये मागितलेत.
मात्र पैसे मागताच त्या महिला प्रवासीने कंटक्टरसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. मी तुम्हाला तिकीटाचे पैसे देत नाही. तुम्ही प्रवाशांची लूट करता. असं म्हणून कंटक्टरला शिवीगाळ केली. तेव्हा कंटक्टरनं त्यांना म्हटले, की तुम्ही मला शिवीगाळ कशाला करत आहात? मी तुम्हाला तिकीटाचे पैसे मागत आहे. मात्र हा वाद वाढत गेला. महिला प्रवासीने कंडक्टर वर्षा सिडाम यांना थापड बुक्यांनी मारहाण केली.
दरम्यान कंडक्टर वर्षा यांना मारहाण करणा-या महिलेचे नाव काजल व पत्ता राजूर कॉलरी असल्याचे कळले. बस वणीत पोहचली. प्रवाशी बसमधून उतरून गेले होते. त्यामुळे चालकाने बस वणी पोलीस स्टेशनच्या बाहेर उभी केली. पोलीस स्टेशनला येवून त्यांनी सदर महिला प्रवाशी विरुध्द तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 121(1), 352, 351(2), 351(3) अन्वये आरोपी प्रवासी महिलेवर गुन्हे दाखल झालेत. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.
Comments are closed.