कला वाणिज्य महाविद्यालयाची दक्षिण भारतात शैक्षणिक सहल
मारेगाव: मारेगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने बी.एस्सी.भाग १, २, ३ च्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल संपन्न झाली. या शैक्षणिक सहलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भौगोलिकदृष्ट्या माहिती व्हावी आणि ज्ञानात भर पडावी यासाठी तसेच भारतीय संस्कृतीचे दर्शन व्हावी या उद्देशाने या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
या सहलीत ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. दक्षिण भारतातील कोडाई कॅनल, उटी, मैसुर, बेंगलोर व हैद्राबाद या ठिकाणाचा समावेश या शैक्षणिक सहलीमधे करण्यात आला होता. या सहलीची नियोजन वनस्पती शास्त्राचे प्रमुख डॉ. प्रदिप सौदागर, प्रा.विजय भगत, प्रा. नीलम ठाकरे, प्रा.अशोक खणगण, प्रा. स्नेहल भांदवकर, प्रा.सपना चौधरी यांनी केले. या सहलीत अनेक ऐतिहासिक ठिकाणाचे अवलोकन करण्यात आले.