मंदरजवळ नवी कोरी दुचाकी जळून खाक

संपूर्ण दुचाकी जळाली, बघ्यांची एकच गर्दी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी-घुग्गुस राज्य महामार्गावरील मंदर फाट्याजवळील गॅस गोदामासमोर मंगळवारी, दि. 30 जुलै 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता धावत्या मोटारसायकलला अचानक आग लागली. या घटनेत मोटारसायकल पूर्णपणे जळून खाक झाली, परंतु चालकाला कुठलीही इजा झाली नाही. मात्र दुचाकीचालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

पुरड (पुनवट) येथील वैभव संतोष पिदूरकर (21) हा तरुण त्याने नुकतीच खरेदी केलेल्या होंडा शाईन मोटारसायकलवरून कामानिमित्त वणीकडे येत होता. त्यावेळी मोटारसायकलमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच त्याने वाहन थांबवले. मात्र, क्षणार्धात आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण मोटारसायकल जळून खाक झाली. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही, परंतु वायरिंग शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोटारसायकलला आग लागल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिस तपास सुरू आहे.

Comments are closed.