‘जय श्री रामच्या’ घोषाने दुमदुमले वणी शहर
विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण भारतात रविवार 25 मार्च रोजी रामनवमीचा उत्सव मोठया आनंदात साजरा करण्यात आला. रामनवमी निमित्त शहरात फार मोठी शोभायात्रा काढण्यात आली. शहरात रामनवमी उत्सव समितीद्वारे प्रत्येक वर्षी रामनवमी उत्सव साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी शोभयात्रेतील दृष्य सर्वांचे आकर्षण ठरले. याकरिता संपूर्ण वणी शहर सजविण्यात आले होते.
शोभयात्रेची सुरवात रविवारी सायंकाळी 5.30 वाजता झाली. जुन्या स्टेट बँकेजवळील राम मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत राम लक्ष्मण सीता, परशुराम, राधा कृष्ण, यांचे जिवंत देखावे पहावयास मिळाले. सदर शोभायात्रा ही शाम टॉकीज, भारत माता चौक, दीपक टॉकीज, भगतसिंग चौक, गाडगेबाबा चौक, सर्वोदय चौक, टागोर चाक, आंबेडकर चौक, टिळक चौक, खाती चौक, तुती कमान व तेथून राम मंदीरात या भव्य शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.
या शोभायात्रेत वर्धा, शेगांव, यवतमाळ, वरोरा, मांढली या ठिकाणाहून भजन मंडळांनी उपस्थित दर्शविली. त्यांच्या भजनाने संपूर्ण शहर राममय होऊन गेले. शहरातील जनतेनी आज शेती रामाच्या पालखीचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे तालासुरात नाचणाऱ्या अश्वानी सर्वांचे लक्ष वेधले होते. शोभायात्रेत जबलपस 2000 लोकांनी सहभाग घेतला होता. शोभयात्रेची लांबी 500 ते 700 मीटर एवढी होती.
शोभायात्रेत वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार ,संजय पिंपलशेंडे, सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे, गणपत लेडांगे उपस्थित होते. याशिवाय बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे कार्यकर्ते सहभागी होते. शोभायात्रे नंतर रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा कचरा हाऊ नये म्हणून शोभायात्रेच्या मागे राहून संघाच्या कार्यकर्त्यांनी झाडू हाती घेतला.परिसर स्वच्छ करीत जात होते. शोभायात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नेहमीच नगर परिषदेचे कर्मचारी परिसर स्वच्छ करीत असतात.परंतु या वर्षी संघाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
य़ा उत्सवासाठी राम उत्सव समितीचे कुंतुलेश्वर तुरविले, कौशिक खेरा, आशिष डंभारे, निलेश डवले, अवि आवारी, मयूर मेहता, कुणाल मुत्यलवार, प्रवीण पाठक, पंकज कासावार, अक्षय देठे, ईश्वर घटोळे, रोहन शिरभाते, कुशल मेहता, निलेश मादीकुंटावार आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेे…
लिंकवर क्लिक करून पाहा रॅलीचा व्हिडीओ….