वणी शहरातील कुख्यात चोर भुऱ्या अखेर तडीपार

चोरी आणि शस्राच्या जोरावर दहशत पसरवल्याने पुन्हा स्थानबद्ध

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरात 2022 पासून वारंवार चोरीच्या घटनांमुळे कुख्यात बनलेला अमोल उर्फ भूऱ्या विजय ठाकरे (वय 31, रा. रामनगर, चिखलगाव, वणी) याला अखेर स्थानबद्ध करण्यात आले आहे. वारंवार अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर येऊन तो चोरी करायचा. तसेच तडीपार आदेश संपल्यानंतर पुन्हा शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. चोरी व अवैध शस्त्रे बाळगून त्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते.

वणी पोलीस स्टेशनने याप्रकरणी गंभीर दखल घेत अमोल उर्फ भूऱ्या याला एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यासाठी यवतमाळच्या जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार, गुरुवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी जिल्हादंडाधिकारी, यवतमाळ यांच्या आदेशाने अमोल उर्फ भूऱ्या याला स्थानबद्ध करण्याचा आदेश प्राप्त झाला. या आदेशानुसार, त्याला नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर आणि डी.बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद वसीम, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पुष्पलवार, गजानन कुडमेथे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
ही कारवाई शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पुनवट जवळ निर्गुडा नदीत बुडून शेतक-याचा मृत्यू

Comments are closed.