सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात 1900, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

स्व. दिलीप कोरपेनवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजन, लवकरच निकाल जाहीर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्व. दिलीप कोरपेनवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा रविवारी (14 सप्टेंबर 2025) मोठ्या उत्साहात संपन्न झाली. विजय चोरडिया मित्रपरिवार आणि स्माईल फाऊंडेशन, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशपूर येथील छोरिया ले-आऊटमधील श्री विनायक मंगल कार्यालयात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तब्बल 1900 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. इयत्ता 4 थी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अ, ब आणि क असे तीन गट करण्यात आले होते. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची होती.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल चोरडिया व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद तसेच स्व. दिलीप कोरपेनवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून सरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

अध्यक्षस्थान विजय चोरडिया यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी रमेश बोबडे, राजेश खुसपुरे, स्माईल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष पियुष आत्राम व पुष्पा जाधव उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवर शिक्षक-शिक्षिका देखील उपस्थित राहिले. विशेष म्हणजे, स्व. दिलीप कोरपेनवार यांचे कुटुंबीय पत्नी नम्रता कोरपेनवार, मुलगा रोहन कोरपेनवार व मुलगी अस्मिता कोरपेनवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अध्यक्षीय भाषणात विजय बाबू चोरडिया म्हणाले
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता अशा स्पर्धांचे आयोजन पुढेही नियमितपणे करण्यात येईल.”तसेच त्यांनी स्व. दिलीप कोरपेनवार यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करताना सांगितले की सरांनी शहरात प्रामाणिकपणे सामाजिक सेवा केली. वृक्षारोपण केले. जेव्हा जेव्हा लोकांना मदत लागली तेव्हा सर धावून आले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सामाजिक विकास कसा होईल याकडे ते नेहमी लक्ष देत. त्यांनी सेवा केली पण कधीही फळाची अपेक्षा केली नाही.

स्पर्धेत प्रत्येक गटासाठी प्रथम पारितोषिक ₹5,000, द्वितीय ₹4,000, तृतीय ₹3,000 तसेच प्रत्येकी 10 उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. निकाल लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी नाश्ता व पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती.

या यशस्वी आयोजनासाठी स्माईल फाऊंडेशनचे पदाधिकारी व स्वयंसेवक — पियूष आत्राम, आदर्श दाढे, डॉ. विश्वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, दत्तात्रय पुलेंवार, चंदू परेकर, देवेंद्र खरवडे, दिगंबर ठाकरे, भोयर सर, ताजणे मॅडम, संजय पिदुरकर, रोहित ओझा, रोनक बदखल, सिद्धार्थ साठे — यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थापक अध्यक्ष सागर जाधव यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व माध्यमांचे मनःपूर्वक आभार मानले.

Comments are closed.