टाकळी (कुंभा) येथे पार पडला संगीतमय राम कथा सप्ताह
रोहन आदेवार, कुंभा: गेल्या सहा वर्षांपासून टाकळी येथे राम नवमी ते हनुमान जयंती दरम्यानच्या दरम्यान भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. दि. 25,3,2018 ते 1,4,2018 दरम्यान घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात रामयणाचार्य ह.भ.प. वासुदेवजी महाराज वसतकर (शास्त्री) मु. हिंगणे गव्हाण ता. नांदुरा जि. बुलढाणा यांच्या सुमधुर वाणीतून उपस्थितांना कथा सांगण्यात आली. सकाळी 5 ते 7 काकडा आरती, सकाळी 9 ते 11 रामकथा भागवत, दुपारी 2 ते 5 कीर्तन भजन, 5 ते 7 हरिपाठ सायं 9ते 11 रामकथा, भारुड झाकी अशी या कार्यक्रमाची रुपरेषा होती.
रविवारी सकाळी ग्रंथदिंडी झाली. त्यानंतर दु. 1 ते 4 गोपाळकाला व महाप्रसाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामवासी टाकळी (कुंभा) ता. मारेगाव जि. यवतमाळ यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत खेवले, मोरेश्वर राऊत, देवेंद्र देवतळे, हनुमान जुमनाके, राजेश आदेवार, राजु राऊत, सुरेश ठोंबरे, महेंद्र पोंगडे व समस्त ग्रामवासी टाकळी यांनी सहकार्य केले.