मनसेच्या ग्रँड गरबा महोत्सवाची तयारी पूर्ण, आज शुभारंभ

आकर्षक बक्षिसांचा वर्षाव, सेलिब्रिटी आणणार उत्सवात रंगत

बहुगुणी डेस्क, वणी:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून वणी येथे सोमवारी दि. 22 सप्टेंबर पासून भव्य गरबा महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. वणीतील शेवाळकर परिसरात हा गरबा उत्सव होणार आहे. या उत्सवात नामवंत सेलिब्रिटी भेट देणार आहे. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील टप्पू सेनेचे कलाकार या महोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. तसेच स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसांची देखील लूट राहणार आहे.
11 ते 30 वर्षे वयोगटातील विजेत्यांसाठी प्रथम बक्षीस म्हणून दुचाकी गाडी, द्वितीय बक्षीस टीव्ही, तृतीय फ्रिज, चतुर्थ वॉशिंग मशीन, पाचवा लॅपटॉप, सहावा टॅब, सातवा मोबाईल, तर अनुक्रमे सायकल, होम थिएटर आणि पैठणी साडी अशी बक्षिसे असतील. 31 वर्षांवरील वयोगटातील स्पर्धकांसाठी सोन्याची नथ, ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, पैठणी साडी आणि ज्युसर ही बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर 5 ते 10 वर्षे वयोगटातील बालस्पर्धकांसाठी सायकल आणि इतर अनेक आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

गरबा स्पर्धा दररोज सायंकाळी 6 ते 10 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सुमारे 1000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या महोत्सवामुळे वणी शहरातील नवरात्र उत्सवाला नवीन रंगत प्राप्त होणार असून, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये एकता आणि एकोपा वाढण्यास चालना मिळणार आहे. या महोत्सवात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनसेच्या तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, गरबा महोत्सव समिती अध्यक्ष साहिल सलाट, तसेच वैभव पुराणकर, जतीन राऊत, लक्की सोमकुंवर, संस्कार तेलतुंबडे, गौरव पुराणकर, तालिब खान, योगेश तुराणकर, आशिष घनकसार, सतिश ठोंबरे, सचिन कुडमेते आणि कृष्णा कुकडेजा यांच्यासह शहरातील सर्व मनसे पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.

Comments are closed.