बहुगुणी डेस्क, वणी: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत “सेवा पंधरवडा” (दि. 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025) राबवण्यात येत आहे. या पंधरवाड्यात वणी भाजपाच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. असाच एक आरोग्यविषय उपक्रम म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड अभियान आहे. या अभियानांतर्गत वणीकरांना ‘आयुष्यमान भारत कार्ड’ तयार करून दिले जाणार आहे. आयुष्यमान भारत कार्ड धारकांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार करता येतो. यासह आरोग्य विमा योजनेचे अनेक फायदे मिळतात. मंगळवार दिनांक 23 सप्टेंबरपासून या अभियानास सुरुवात होत आहे.
23 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत शहरातील सर्व 14 प्रभागांमधील प्रमुख दुर्ग उत्सव मंडळाजवळ हे अभियान राबवले जाणार आहे. त्या प्रभागातील रहिवाशांना संध्याकाळी 6.00 ते 8.00 या वेळेत निशुल्क आयुष्यमान भारत कार्ड तयार करून दिले जाणार आहे. रोज एक किंवा अधिक दुर्गा उत्सव मंडळाच्या ठिकाणी हे अभियान राबवले जाणार आहे. याचा परिसरातील नागरिकांना लाभ घेता येणार आहे.
आयुष्यमान हे आरोग्याचे सुरक्षा कवच – नीलेश चौधरी
आयुष्यमान भारत कार्ड हे प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्याचे सुरक्षा कवच आहे. वेळेवर आणि मोफत उपचार मिळावेत, यासाठी ही योजना आहे. या योजनेचा लाभ घेणे आजच्या काळाची गरज आहे. सामूहिक सहभागातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविणे शक्य होईल. ज्या दुर्गा उत्सव मंडळांना हे अभियान राबवायचे आहे त्यांनी त्वरित संपर्क साधावा.
— अॅड. नीलेश माया महादेवराव चौधरी, शहर अध्यक्ष भाजप
आपल्या प्रभागात हे अभियान राबवण्यासाठी दुर्गा उत्सव मंडळांना राजू गव्हाणे : 9764253253, दीपक पाऊणकर : 8668825689, बालाजी भेदोडकर : 9545456970 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असून सोबतच रेशन कार्ड व अर्जदाराचा मोबाईल नंबर (आधारला लिंक असलेला, OTP साठी आवश्यक) आहे. या अभियानात अधिकाधिक वणीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन वणी भाजप शहर तर्फे आवाहन करण्यात आले आहे.




Comments are closed.