आज पुन्हा पावसाने वणीकरांना झोडपले !

नवरात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर पावसाचे विरजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज पुन्हा वणीत पावसाने धुंवाधार बॅटिंग केली. दुपारी 3 वाजताच्या दरम्यान आलेला पाऊस सुमारे अर्धा तास तुफान बरसत होता. त्यानंतर संध्याकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. भर दुपारी आलेल्या पावसामुळे जनजीवन तर विस्कळीत झाले. मात्र पावसामुळे नवरात्री निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांवर देखील याचा प्रतिकुल परिणाम होत आहे. तसेच मुसळधार पावसाचा ग्रामीण भागात असलेल्या शेतीचे देखील मोठे नुकसान होत आहे.

सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच पावसाने आपली ताकद दाखवली आहे. थोड्याफार दिवसांचा ब्रेक वगळता पाऊस सततच सुरू आहे. या आठवड्यात केवळ एक दिवस उघाड होता. तर गुरुवारी पहाटेपासूनच सुरु असलेली पावसाची रिपरिप संपूर्ण दिवस सुरु होती. आज दुपारी 3 वाजता अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस कोळसला. 

सांस्कृतिक कार्यक्रमांवर पावसाचे विरजन
सध्या नवरात्री सुरु असल्याने संपूर्ण वणीत ठिकठिकाणी दुर्गा मंडळाजवळ सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, गरबा इत्यादीचे आयोजन केले आहे. मात्र सततच्या पावसाचे या कार्यक्रमवर विरजन येत आहे. पावसामुळे गुरुवारी गरबा नाईट कॅन्सल करण्यात आली. तर अनेक ठिकाणी चिमुकल्यांसाठी आयोजित केल्या जाणा-या स्पर्धा रद्द करण्यात आल्या. नवरात्रौत्सवानिमित्त अनेक मंडळांनी जगराता व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र सततच्या पावसामुळे या कार्यक्रमांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अचानक आलेल्या पावसाने उडाली तारांबळ
आज सकाळी वातावरणात उघाड होता. त्यामुळे पावसाचा नागरिकांना अंदाज आला नाही. ग्रामीण भागातीलही अनेक लोक खरेदी व इतर कामांसाठी वणीत येतात. दुपारी अचानक शहरात वादळी वा-यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान अनेकांनी कॅन्टिन तसेच इतर ठिकाणी आसरा घेतला.

बस चालकाला बसमध्ये शिरून मारहाण; आरोपीवर गुन्हा

Comments are closed.