किरकोळ वादातून टोळक्याचा एका तरुणावर रक्तरंजित हल्ला

पाठलाग करून तरुणाला मारहाण, वणी हादरले

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास वरोरा रोडवर एकता नगर जवळील एका नास्ता सेंटरजवळ थरारक घटना घडली. गाडी उभी करण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच प्राणघातक हल्ल्या पर्यंत पोहोचला.अंकुश मोगरे रा. सेवानगर या तरुणावर आठ  जणांनी लोखंडी रॉड व काठ्यांनी अमानुष हल्ला चढवला. यात तो गंभीर जखमी झाला. वणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सहा आरोपींना अटक केली असून दोघे अनोळखी तरुण फरार आहेत.

तक्रारीनुसार, जखमी अंकुश मोगरे हा रात्री उशीरा एकता नगर जवळील एका पान टपरीजवळ गेला होता. दरम्यान त्याने तिथे गाडी पार्क केली. मात्र गाडी पार्क करण्यावरून वाद निर्माण झाला. दरम्यान तिथे असलेले अंकुशच्या अंगावर गेले. त्यांनी अंकुश मोगरेला जमिनीवर पाडून लोखंडी रॉड व काठ्यांनी डोक्यावर, पाठीवर, हातापायावर बेदम मारहाण करण्यात आली.

अंकुशने जिव वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. मात्र आरोपींनी पाठलाग करत तहसिल कार्यालयाजवळ त्याला गाठले. तिथे त्याला पुन्हा निर्दयपणे मारहाण केली. विशेष म्हणजे हल्लेखांना हल्ला करताना जवळ पोलीस स्टेशन आहे याची देखील भीती नव्हती. जखमी अंकुश मोगरेवर चंद्रपूर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नगर परिषद कर्मचारी भोलेश्वर नारायण ताराचंद यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी विलास चौहाण, विशाल चौहाण, सुर्यभान चौहाण, विरसिंग उर्फ विरु लीवारे, दुर्गेश उर्फ सोनु चौहाण, अथर्व उईके व आणखी दोन अनोळखी आरोपींविरोधात बीनएसच्या कलम 109, 189 (1)(2)(3)(4), 190, 191(1)(2)(3) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सुदाम आसोरे करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वणी शहर हादरले आहे.

Comments are closed.