गोतस्करीवर पायबंद घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत गोतस्करीसह, तेलांगणातील तांदूळ, गुटखा तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र याला आळा घालण्यात एसडीपीओ पथकासह स्थानिक गुन्हे शाखाही अपयशी ठरली आहे. पाटण पोस्टे अंतर्गत दिग्रस पुलावरून अनंतपुर मार्गे ही तस्करी होत असून पाटण ठाणेदारासह कर्मचाऱ्यांचे चांगभले होत आहे. वरील तस्करांची माहिती व पाटण पोलीस कर्मचारी डीवायएसपीच्या पथकांना असून थातूरमातुर कार्यवाही करून वरिष्ठांना खुश करणे सुरू असून मोठ्या तस्करांना अभय देऊन केवळ मजुरांवर कार्यवाही केली जात आहे.
जनावर तस्करांवर कार्यवाही न करण्याची जणू सवयच लागली आहे. पांढरकवडा, मारेगाव, वणी, पाटण, पोलिस स्टेशन अंतर्गत कायर, नवरगाव ,घोंसा, व वरोरा सह इतर ठिकाणी शनिवार, रविवार व सोमवारला बाजार भरतो. या बाजारातील शेतकऱ्यांचे गाय व बैल तस्कर कवडीमोल भावात घेऊन पायदळ व चारचाकी वाहनाने सर्रास तालुक्यातील दिग्रस मार्ग अंतपुर वरून तेलांगांनात नेल्या जात आहे. याची माहिती पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांना माहित असूनही यावर पायबंद लावण्याऐवजी ते मूग गिळून बसून असल्याचे दिसत आहे.
पाटण स्टेशन अंतर्गत झरी, पाटण, शिबला, मांडवी, दुर्गापूर, मुछी, सतपल्ली, देम्बाडदेवी, उमरी पोड, वाठोली व इतर गावात दारू तस्करी, वरली मटका, अवैद्य दारू विक्री, खुलेआम सुरू असून हे सुरू असण्यामागे ‘अर्थ’पूर्ण व्यवहार असल्याची चर्चा आहे. तर काही पोडावर हातभट्टी सुद्दा सुरु आहे ज्यामुळे लोकांच्या जीवाचा प्रश्न सुद्धा उदभवला आहे.
या सर्व अवैध धंदेवाल्यांची संपूर्ण माहिती दोन्ही पथकातील काही अधिकारी कर्मचारी यांच्या कडे आहे. यातील कर्मचारी वसुली करिता येत असल्याची सुद्धा माहिती आहे. वणीतुन दर गुरुवार, शुक्रवार,व शनिवार या तीन दिवसात चार चाकीने गोतस्करी तेलांगण्यात होत असून याची माहिती सर्वसामान्यांना देखील आहे. मग वणी पोलीस स्टेशन व डी वाय एस पी पथक कसे माहित नाही असा संतप्त प्रश्न जनता करीत आहे.
जनावर तस्करा संबंध असल्याचे बोलले जात आहे तरी पाटण व दोन्ही पथकातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाईल सीडीआर काढल्यास सत्यता बाहेर निघेल हे नक्की. जिल्ह्यासह तालुक्यात वाढलेल्या तस्करी व अवैद्य धंद्याविरुद्ध लोकप्रतिनिधीं गप्प का? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. बहुतांश अवैद्य धंदे राजकारणी लोकांचे तसेच त्यांच्या नातेवाईक, कार्यकर्ते यांचे आहे. त्यामुळे कार्यवाही होत नसल्याचे सर्वसामान्य बोलतात. या सर्व अवैध धंद्यांवर टाच आणावी अशी प्रतिक्रिया सुजाण नागरिकांमधून उमटत आहे.