वणी भालर मार्गावर खळबळजनक हत्याकांड: ब्लॅकमेलिंगची किनार?

बेपत्ता तरुणाचा जी.एस. ऑईलमिल परिसरात पाण्याच्या टाक्यात मृतदेह

बहुगुणी डेस्क, वणी: आज वणी भालर मार्गावरील जी.एस. ऑईलमिल कंपनीच्या परिसरात पाण्याच्या खोल टाक्यात एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव मनोज वानखेडे (वय 35, रा. वागदरा, ता. वणी) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, मनोज वानखेडे हा रंगकाम (कलरिंग) करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो वागदरा येथील रहिवासी होता. तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या पत्नीने मंगळवारी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी पती बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती.

मात्र आज बुधवारी पोलिसांना भालर रोडवरील जीएस ऑईल मील परिसरातील पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळल्याची माहिती मिळावी. वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृताची ओळख पटली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ब्लॅकमेलिंगचे कनेक्शन ?
काही दिवसांपासून मृतकाला धमकी येत होत्या. या प्रकरणाला ब्लॅकमेलिंगची किनार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दिशेने पोलीस पोलीस तपास करीत असून चौकशीसाठी संशयीताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलीस प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांचा शोध घेतला जात आहे.

Comments are closed.